www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
मायक्रोसॉफ्टचे प्रमुख बिल गेटस यांनी सत्या नडेला यांच्या नावाची घोषणा केली, तेव्हा बिल गेटस म्हणाले, मायक्रोसॉफ्टसमोर भविष्यात आणखी मोठी आव्हानं आहेत.
मात्र आपल्यासमोर तेवढ्याच मोठ्या संधी सुद्धा आहेत. म्हणूनच मला आनंद आहे, या संधी काबिज करण्यासाठी आपल्याला एक मजबूत नेतृत्व मिळालं आहे.
बिल गेटस स्टीव बॉमर नंतर सत्या नडेला हे मायक्रोसॉफ्टचे तिसरे सीईओ आहेत.
कर्मचाऱ्यांना मेल लिहिला
नियुक्तीची घोषणा झाल्यानंतर सत्या नडेलाने मायक्रोसॉफ्टच्या कर्मचाऱ्यांना मेल लिहिला आहे. यात त्यांनी आपल्या बाबतीत बोलतांना म्हटलंय, मी ४६ वर्षांचा आहे, २२ व्या वर्षापासून माझं लग्न झालं आहे, मला तीन मुलं आहेत.
मला ज्ञानाची भूक
तसेच माझे मित्र मला व्यवस्थित ओळखतात, त्यांना माहित आहे, मला नेहमी कुतूहल असतं, शिकण्याची उत्कंठा लागून असते, मला ज्ञानाची भूक असते, मी जेवढे पुस्तक वाचतो, त्यापेक्षा जास्त खरेदी करतो. मी जेवढे ऑनलाईन कोर्स करतो, त्यापेक्षा अधिक कोर्सेसना प्रवेश घेतो.
सत्या नडेला मागील २२ वर्षांपासून मायक्रोसॉफ्टसाठी काम करीत आहेत, ते मूळचे भारतीय असून आता अमेरिकेत आहेत. आंध्र प्रदेशातील हैदराबादचे ते रहिवासी आहेत.
मूळचे हैदराबादचे
सत्या नडेला यांचं मूळ गाव बकनूर आहे ते आंध्रप्रदेशातील अनंतपूरमध्ये आहे. सत्या यांचा जन्म १९६७ मध्ये झाला, त्यांचं शिक्षण भारत आणि अमेरिकेत झालं.
सत्या नडेला हे १९९२ पासून मायक्रोसॉफ्टमध्ये आहेत, त्यांना मोठ्या जबाबदाऱ्या देण्यात आल्या, त्यांना बिंग सर्च इंजिनचं कामही देण्यात आलं होतं.
मायक्रोसॉफ्टच्या वेबसाईटवर दिलेल्या माहितीनुसार सत्या नडेला यांनी मंगलोर युनिवर्सिटीतून १९८८ मध्ये इलेक्ट्रीकल इंजीनिअरिंगची डिग्री घेतली. यानंतर त्यांनी अमेरिकेच्या विस्कॉन्सिन-मिलवॉकी युनिवर्सिटीत कंम्प्युटर सायन्सची डिग्री घेतली, शिकागो युनिवर्सिटीत एमबीए केलं.
सत्या नडेला यांचं वडिल बीएन युगांधर हे भारतीय प्रशासकीय सेवेत होते. युगांधर २००४ पासून २००९ पर्यंत योजना आयोगाचे सदस्य होते.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.