www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
सोशलनेटवर्किंग साईटमध्ये आघाडीवर असणाऱ्या ‘फेसबुक’ने आपला चेहरामोहरा बदलणार आहे. फेसबुक अॅपला नवा लूक देण्यासाठी एका भारतीय कंपनीची निवड केली. फेसबुक आपले युजर वाढवण्यासाठी आपल्या अॅपला नवे रुप देणार आहे. यासाठी बोली लावण्याचे बोलले जाते
जगामध्ये भारतीय सॉफ्टवेअर अभियंत्याने आपला दबदबा निर्माण केला आहे. या सोशलसाईटचे आता नुतनीकरण करण्यात येणार आहे. फेसबुकचे नुतनीकरण करण्यासाठी फेसबुक या कंपनीने भारतीय ‘लिटिल आय लॅब्स’ कंपनीची निवड केली आहे. त्यामुळे आता भारतीय बदलणार आहेत फेसबुकचा चेहरा...
भारतीय सॉफ्टवेअर कंपन्यांचं काम पाहून अनेक देश आवाक होतात. त्यामुळंच आता फेसबुकनं आपलं अॅप सुधारण्यासाठी बंगळुरुच्या एका कंपनीला निवडलंय.
लिटिल आय लॅब्स नावाची ही कंपनी मोबाईलमधील अॅपला जास्त चांगल्या प्रकारे फास्ट बनवणार आहे. लिटिल आय लॅब्सचे मालक गिरीधर मूर्ती आहे. ही कंपनी मोबाईल अॅपला मॉनिटर करण्याचे काम करते. या कंपनीची अधिक माहिती लिटिल आय लॅब्सच्या वेबसाईटवर देण्यात आली आहे.
फेसबुकचे अधिकारी सुब्बू सुब्रमण्यम यांनी सांगितले की, फेसबुकने पहिल्यांदाच भारतीय कंपनीचे निमंत्रण दिले आहे. यामुळे फेसबुक अॅपमध्ये अमुलाग्र सुधारणा होण्यास मदत मिळेल. या दोन्ही कंपन्यांमधील बोलीची किंमत अद्याप जाहीर करण्यात आलेली नाही.
मात्र सूत्रांच्या माहितीनुसार ही बोली ६२ कोटी ते ९३ कोटींच्या घरात होण्याची शक्यता आहे. मिळालेल्या महितीच्या आधारे लिटिल आय लॅब्सची टीम कॅलिफोर्नियामधील मेनलो पार्क येथील फेसबुकच्या मुख्यालयामध्ये जाणार आहे. त्या ठिकाणी ही कंपनी फेसबुक अॅपला नवा लूक देणार आहे.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.