www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
तुम्हाला तिकिट काढण्यासाठी तासंतास रांगेत उभे राहावे लागणार नाही. तसेच ३० दिवस आधी तिकिट काढून ठेवण्याची गरज नाही. कारण तुम्ही जसे एटीएममधून पैसे काढता. त्याचप्रमामे एटीएममधून तुम्हाला तिकिट मिळणार नाही. रेल्वे, बस आणि विमानाची तिकिटे मिळू शकतील.
एटीएमचा दररोजच्या जीवनात महत्व वाढत आहे. सध्या केवळ पैसे काढणे, चेक जमा करणे, मोबाइल रिचार्च आदीसाठी एटीएम वापरात आणले जाते. मात्र, हेच एटीएम तुम्हाला आता प्रवासासाठी तिकिट उपलब्ध करून देणार आहे.
बस, रेल्वे, विमान आदींची तिकिटे काढणे, पासबुकचे प्रिंटिंग, अकाऊंट स्टेटमेंटची प्रिंट घेणे यासारखी कामे एटीएममार्फत करता येणार आहेत. याबाबतचे प्रात्यक्षिक मुंबईत आयोजित केलेल्या एटीएमच्या एका प्रदर्शनात दाखविण्यात आलेय बरं का. त्यामुळे भविष्यात एटीएममधून प्रवास तिकिट काढणे सोपे होणार आहे.
एटीएम उत्पादकांनीही या क्षेत्रातच संशोधन करून नवनवीन उत्पादने विकसित केली आहेत. त्यात एक महत्त्वाचा ट्रेंड म्हणजे बायोमेट्रिक एटीएम. आधार संलग्न बँक खाते, एटीएममधील व्यवहारांसाठी आवश्यक झालेली वाढती सुरक्षा ध्यानात घेऊन एनसीआर, डिबोल्ड, एजीएस, हिताची यासह इतरही कंपन्यांनी बोटाच्या ठशावरून अधिकृत व्यक्तीची पडताळणी करता येईल, अशी व्यवस्था एटीएममध्ये उपलब्ध करून दिली आहे. त्यासाठी नेहमीच्या की-पॅड शेजारीच बोटाचा ठसा उमटविण्यासाठी सोय आहे.
तिकीट काढण्याची सोय असलेले एटीएम फोर्ब्स टेक्नोसिस या कंपनीने विकसित केले आहे. यासाठी कंपनीने स्वतंत्र अॅप्लिकेशन उपलब्ध करून दिले आहे. यानुसार विमान, रेल्वे, बसची तिकीटे आरक्षित करता येतात.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.