www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
नोकियाने आपली गेलेली पत सुरण्यावर भर दिला आहे. नोकियाने आपल्या मोबाईलमध्ये अॅड्राईड आणण्याचा निर्धार केला आहे. तशी चाचपणी होत आहे. आतार भारतीय बाजारपेठ काबीज करण्यासाठी अॅपल कंपनीची तयारी सुरू आहे. सॅमसंगने मोठ्याप्रमाणात बाजारपेठ काबीज केलेय. आता तर याला टक्कर देण्यासाठी अॅपल आयफोन ४ मार्केटमध्ये आणणीत आहे.
अॅपलचा आयफोन ४ हा ८ जीबीचा आहे. त्याची किंमत केवळ १५,००० रुपये असणर आहे. त्यामुळे मोबाईल ग्राहकांची या फोनच्या खरेदीसाठी झुंबड उडेल, अशी शक्यता आहे. सध्या भारतीय बाजारात सॅमसंग, मायक्रोमॅक्स यासारख्या कंपन्यांची चलती आहे.
या कंपन्यांना टक्कर देण्यासाठी अॅपलने आयफोन-४ हा स्वस्त किंमतीत बाजारात आणला आहे. यापूर्वी आयफोन-४ ची किंमत २६ हजार ५०० रुपये होती. आयफोन ४ हा तीन वर्षापूर्वी लाँच करण्यात आला होता. त्यानंतर आयफोन ४ एस, ५ सी आणि ५ एस हे फोन लाँच केले होते.
काही महिन्यांपासून अॅपलने आपलं उत्पन्न थांबवलं होतं. मात्र, कंपनीच्या लेटेस्ट फोनच्या विक्रीत वाढ व्हावी, यासाठी हा निर्णय घेतल्याचे सांगण्यात येत आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.