असं आहे अॅपलचं नवीन आयओएस-७…

अॅपलचं नवीन ऑपरेटींग सिस्टम नुकतंच लॉन्च करण्यात आलंय. जुन्या आयओएस सिस्टमपेक्षा यामध्ये काही ठळ्ळक बदलही करण्यात आलेत.

Shubhangi Palve शुभांगी पालवे | Updated: Sep 19, 2013, 04:20 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
अॅपलचं नवीन ऑपरेटींग सिस्टम नुकतंच लॉन्च करण्यात आलंय. जुन्या आयओएस सिस्टमपेक्षा यामध्ये काही ठळ्ळक बदलही करण्यात आलेत. आयफो ४, ४ एस, ५ आणि आयपॅड-२ या उपकरणांत नवीन ‘आयओएस-७’ फ्री डाऊनलोड करता येऊ शकेल. आयपॉड, आयपॅड मिनी तसचं आयपॅडच्या तिसऱ्या आणि चौथ्या जनरेशनमध्येही हे अपडेट ऑपरेटींग सिस्टम तुम्हाला अपडेट करता येईल. तर अॅपलचे नवीन फोन ५ एस आणि ५ सी या नवीन फोनमध्ये ही ऑपरेटींग सिस्टम पहिल्यापासूनच उपलब्ध असेल.
कंट्रोल सेन्टर
आयओएस-७ च्या माध्यमातून यूजर्स कंट्रोल सेन्ट्रर वापरू शकतील. यामुळे त्यांना स्क्रीनचा कलर, ब्राईटनेस, एरोप्लेन मोड किंवा आयफोनचा फ्लॅश ओपन करून फोन फ्लॅशलाईटसारखा वापरणं अशा अनेक गोष्टी करता येऊ शकतील.
ऑटोमॅटिक अॅप्लिकेशन अपडेट
अप्लिकेशन अपडेट करण्यासाठी तुम्हाला काहीही त्रास घ्यावा लागणार नाही. कारण, या ऑपरेटींग सिस्टमद्वारे अॅप्लिकेशन ऑटोमॅटिक अपडेट होऊ शकतील.
एअरड्रॉप
आयओएस-७ मधलं एअरड्रॉप हे अॅप्लिकेशन भलतंच हीट होण्याची चिन्हं दिसतायत. एअरड्रॉपच्या माध्यमातून यूजर्स आपले फोटो, व्हिडिओ वाय-फाय किंवा ब्लूटूथच्या साहाय्यानं जलदगतीन एकमेकांशी शेअर करू शकतात. सॅमसंग गॅलक्सी स्मार्टफोनला अॅपलनं दिलेलं हे तगडं उत्तर आहे.
फोटो फिल्टर्स
फोटोंचे वेडे आता आपल्या फोटोंवर आयओएस-७ च्या माध्यमातून अनेक फिल्टर्स अप्लाय करू शकतील. त्यामुळे तुम्हाला आता तुमच्या डिव्हाईसमध्ये इन्स्टाग्रामची गरज लागणार नाही. आयओएस-७ मध्ये वेगवेगळे नऊ फिल्टर्स आहेत.
सफारी स्मार्ट सर्च फिल्ड
‘सफारी’चा टॉप बार आता गायब होणार आहे (अॅड्रेस आणि सर्च फिल्ड). अॅपलनं आता हे दोन वेगवेगळे बार एकाच ‘यूनिफाईट स्मार्ट सर्च फिल्ड’मध्ये एकत्र केले आहेत. इथं तुम्ही वेबसाईटचा अॅड्रेस किंवा सर्च क्वेरी टाकू शकता.

आय ट्यून रेडिओ
‘आयओएस-७’च्या म्युझिक अॅप्लिकेशनमध्ये आय ट्यून रेडिओचा समावेश करण्यात आलाय. त्यामुळे श्रोते ब्रेकशिवाय आणि जाहिरातींशिवाय गाण्यांचा आस्वाद घेऊ शकतात. हे अॅप्लिकेशन इंटरनेट रेडिओ सर्व्हिस पॅन्डोराप्रमाणे काम करील.
सीरी
आयफोनचे अनेक यूजर्स ‘सीरी’चे चाहते आहेत. ट्विटर आणि विकिपिडियाच्या माध्यमातून वेगवेगळ्या प्रकारची अपडेट माहिती ‘सीरी’मधून तेही मधूर आवाजात (पुरुष आणि स्त्री) तुम्हाला ऐकायला मिळेल.

फेस टाईम ऑडिओ
इतर ‘आयओएस’ सिस्टम यूजर्सशी तुम्ही ‘फेस टाईम ऑडिओ’च्या माध्यमातून तुम्ही फ्रीमध्ये बोलू शकता. ‘फेस टाईम व्हिडिओ’ आणि स्काईपप्रमाणेच ‘फेस टाईम ऑडिओ’साठीही इंटरनेटची गरज असेल. इंटरनेटच्या माध्यमातून फ्री तुम्हाला या अॅप्लिकेशनद्वारे इतर आयओएस यूजर्सशी फ्री संवाद साधता येऊ शकेल.
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.