www.24taas.com, झी मीडिया, नवी दिल्ली
भारताने सर्वात स्वस्त तयार केलेल्या आकाश टॅब्लेटमध्ये काही त्रुटी होत्या त्या दूर करण्यावर भर दिलाय. आता या टॅब्लेटच्यामाध्यमातून तुम्ही बोलू शकणार आहात. कारण ‘आकाश’ टॅब्लेटमध्ये कॉल सुविधा आता असणार आहे.
विद्यार्थ्यांना परवडणारा असा आकाश टॅब्लेट सरकारने २०११ मध्ये सादर केला. पण जेव्हा हा टॅब्लेट आला तेव्हा त्याच्यात कॉलची सुविधा नव्हती. परंतु आकाशच्या नवीन योजनेअंतर्गत येणारा नव्या टॅब्लेटमध्ये कॉल करण्याची सुविधा असणार आहे.
सरकारने सोमवारी या नवीन येणाऱ्या टॅब्लेटमधील फिचरर्सची माहिती दिली. या माहितीनुसार, या टॅब्लेटमध्ये बाह्य डोंगलच्या साथीने फोनच्या रुपाने काम करणारा एक ड्रायवर असेल. हा टॅब्लेट २जी, ३जी आणि ४जी डोंगलच्या मदतीने काम करेल. उल्लेखनीय बाब अशी की, आकाशच्या योजनेंतर्गत या टॅब्लेटची किंमत विद्यार्थ्यांच्या दृष्टीने कमीतकमी ठेवण्यात येणार आहे.
आकाशने याआधी ५ ऑक्टोबर २०११ मध्ये सादर केला होता. त्यावेळेला त्याची किंमत होती २२७६ रुपये. आता एका नवीन बदलासह हा टॅब्लेट येणार आहे. ज्यात फोन करण्याची सुविधा तर आहेच पण त्याचप्रमाणे हा ४जी या टेक्नॉलॉजीचा सपोर्ट घेता येऊ शकणार आहे.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.