‘ल्युमिया १०२०’ची किंमत तब्बल १० हजारांनी घसरली!

काही दिवसांपूर्वी स्मार्टफोन बाजारात दाखल झालेल्या ‘नोकिया ल्युमिया १०२०’ या स्मार्टफोनची किंमत तब्बल १० हजार रुपयांनी कमी करण्यात आलीय.

Updated: Dec 26, 2013, 04:07 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, नवी दिल्ली
काही दिवसांपूर्वी स्मार्टफोन बाजारात दाखल झालेल्या ‘नोकिया ल्युमिया १०२०’ या स्मार्टफोनची किंमत तब्बल १० हजार रुपयांनी कमी करण्यात आलीय.
नोकिया मोबाईल कंपनीनं आपल्या ‘ल्युमिया’ सीरिजमधला स्मार्टफोन ‘ल्युमिया १०२०’ हा स्मार्टफोन बाजारात लॉन्च केला होता. लॉन्च करताना या मोबाईलची किंमत ४९,९९० रुपये इतकी निर्धारीत करण्यात आली होती. नोकियानं आपल्या वेबसाईटवर तसं जाहीरही करण्यात आलं होतं. पण, हीच किंमत अवघ्या काही दिवसांत तब्बल १०,००० रुपयांनी कमी करत नोकियानं सध्या हा मोबाईल अवघ्या, किंमत ४१,४९९ रुपयांत उपलब्ध करून दिलाय. सध्या नोकियाच्या अधिकृत वेबसाईटवरही ‘ल्युमिया १०२०’ची हीच किंमत दिसतेय.
महत्त्वाचं म्हणजे, नोकियानं आपला ‘ल्युमिया १५२०’ हा नवीन स्मार्टफोन नुकताच बाजारात लॉन्च केलाय. त्यानंतर काही दिवसांतच ‘ल्युमिया १०२०’ची किंमत जवळजवळ १०,००० रुपयांनी कमी करण्यात आलीय.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.