भारताच्या विजयाचा `श्रीगणेशा`

टी-20 वर्ल्ड कपमध्ये सलामीच्या लढतीत दुबळ्या अफगाणिस्तानविरुद्ध विजयासाठी टीम इंडियाला चांगलाच घाम गाळावा लागला. भारतानं अफगाणिस्तानविरुद्ध 23 रन्सने विजय मिळवला असला तरी बॅट्समन आणि बॉलर्सची कामगिरी निराशाजनकच होती. टी-20 वर्ल्ड कपचा पहिल्याच लढतीत लिंबुटिबू अफगाणीस्ताननं टीम इंडियाला विजयासाठी चांगलंच झुंजवलं...

Jaywant Patil जयवंत पाटील | Updated: Sep 21, 2012, 07:57 PM IST

www.24taas.com, कोलंबो
टी-20 वर्ल्ड कपमध्ये सलामीच्या लढतीत दुबळ्या अफगाणिस्तानविरुद्ध विजयासाठी टीम इंडियाला चांगलाच घाम गाळावा लागला. भारतानं अफगाणिस्तानविरुद्ध 23 रन्सने विजय मिळवला असला तरी बॅट्समन आणि बॉलर्सची कामगिरी निराशाजनकच होती. टी-20 वर्ल्ड कपचा पहिल्याच लढतीत लिंबुटिबू अफगाणीस्ताननं टीम इंडियाला विजयासाठी चांगलंच झुंजवलं...
भारतानं 23 रन्सनी विजय मिळवला असला तरी सलामीच्या लढतीतील कामगिरी निराशाजनकच होती. बॅटिंगला आल्यानंतर सुरुवातीपासूनच अफगाणिस्तानच्या बॉलर्सनी टीम इंडियाला धक्के दिलेत. गौतम गंभीर आणि वीरेंद्र सेहवाग 22 रन्सवर पॅव्हेलियनमध्ये परतले होते. त्यानंतर युवराजही 18 रन्स काढून पव्हेलियनमध्ये परतला... विराट पुन्हा एकदा टीम इंडियाच्या मदतीला धावून आला.विराटची हाफ सेंच्युरी, सुरेश रैनाचे 38 रन्स आणि अफगाणी फिल्डर्सनी दिलेले जीवदान यांमुळे भारताला 160 रन्सचं टार्गेट अफगाणीस्तानसमोर ठेवता आलं.
अफगाणिस्तानच्या बॅट्समननी भारताच्या लक्ष्याचा पाठलगाला धडाक्यात सुरुवात केला. नवरोझ मंगलची 22 रन्सची खेळी आणि करिम सादिकच्या 26 रन्सच्या खेळीमुळे अफगाणिस्ताननं भारतीय टीमला बॅकफूटवर ढकललं होत..तर मोहम्मद नबीनंही भारतीय टीमला चांगलाच घाम फोडला. मात्र आर.अश्विन आणि युवराजच्या फिरकीनं भारताला तारलं. युवराजनं 24 रन्स देत अफगाणिस्तानच्या 3 विकेट्स घेतल्या. तर अश्विननं 20 रन्स देत 2 विकेट्स घेत विजयाचा मार्ग सुकर केला. दोघांच्या फिरकीमुळे भारताला सलामीची लढत जिंकता आली. तर बालाजीनंही तीन महत्वपूर्ण विकेट घेत भारताचा विजय निश्चित केला.