मुंबई : रोईंग या क्रीडा प्रकारात ऑलिंपिकमध्ये धडक मारणा-या दत्तू भोकनळला अखेर राज्य सरकारनं मदत केली आहे.
झी 24 तासच्या वृत्तानंतर सरकारला जाग आली असून पाच दत्तूला पाच लाखांची मदत देण्याचा निर्णय क्रीडा खात्यानं घेतलाय. यासंदर्भातलं पत्र आणि धनादेश दत्तूला पाठवण्यात आला आहे.
दत्तू हा ऑलिम्पकची तयारी करण्यासाठी अमेरिकेला गेलाय. मात्र आर्थिक समस्येमुळं दत्तूवर सराव थांबवण्याची आणि हॉटेल सोडण्याची वेळ आली होती. यासंदर्भात त्यानं झी 24 तासकडे व्यथा मांडली. त्यानंतर सकाळपासून झी 24 तासनं हा मुद्दा लावून धरला.
त्यानंतर सरकारनं धावाधाव करत 24 तासांच्या आत दत्तूला दिलेल्या आश्वासनाची पूर्तता केली. ऑलिम्पिकमध्ये निवड झाल्यानंतर क्रीडामंत्री विनोद तावडे यांनी दत्तूला पाच लाखांची मदत जाहीर केली होती. मात्र नंतर ही मदत नाकारण्य़ात आली होती.