हा दिग्गज भारतीय गोलंदाज करणार आज निवृत्तीची घोषणा

भारताचा डावखुरा गोलंदाज झहीर खान गुरूवारी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा करणार आहे. इंडियन प्रिमिअर लीगचे चेअरमन राजीव शुक्ला यांनी घोषणा केली आहे. 

Updated: Oct 15, 2015, 02:03 PM IST
हा दिग्गज भारतीय गोलंदाज करणार आज निवृत्तीची घोषणा  title=

मुंबई : भारताचा डावखुरा गोलंदाज झहीर खान गुरूवारी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा करणार आहे. इंडियन प्रिमिअर लीगचे चेअरमन राजीव शुक्ला यांनी घोषणा केली आहे. 

मी पुढील सिझनसाठी ट्रेनिंग घेत असताना माझा खांदा दुखू लागला. एका दिवसात १८ ओव्हर टाकू शकत नव्हतो. त्यावेळी ठरवले आता वेळ आली आहे. असे झहीर खान याने आपल्या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे. 

स्थानिक क्रिकेटवर आणि आयपीएलच्या ९ व्या सिझनवर लक्ष्य केंद्रीत करण्यासाठी मी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेत असल्याचे झहीरने म्हटले आहे. 

शुक्ला यांनी ट्वीट करून सांगितले की 'झहीर आज निवृत्तीची घोषणा करणार आहे. निवृत्तीनंतर पुढील करिअरसाठी शुभेच्छा... 

मुंबईचा ३७ वर्षीय झहीर खानने आंतरराष्ट्रीय क्रिकेटची सुरूवात ३ ऑक्टोबर २०००मध्ये नैरोबीमध्ये केनियाविरूद्ध वन डे मॅचने केली होती. त्याने पहिली टेस्ट नोव्हेंबर २०००मध्ये ढाकामध्ये बांग्लादेश विरोधात खेळली होती. 

आपल्या १४ वर्षांच्या आंतरराष्ट्रीय करीअरमध्ये ९२ टेस्ट मॅचमद्ये ३२.९४च्या सरासरीने ३११ विकेट घेतल्या. त्याने २०० वन डे २९.४३च्या सरासरी २८२ विकेट आणि १७ टी-२० मॅचमध्ये १७ विकेट घेतल्या. त्याने १६९ प्रथम श्रेणी ६७२ विकेट घेतल्या आहेत. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.