नवी दिल्ली : भारताचा माजी वेगवान गोलंदाज झहीर खानकडे भारतीय टीमच्या गोलंदाजी प्रशिक्षकपदाची जबाबदारी देण्याचा विचार बीसीसीआय करत होती. टीम इंडियाचे प्रशिक्षक अनिल कुंबळे यांनीही याला मंजुरी दिली होती. मात्र झहीरच्या दोन अटींमुळे त्याच्यावर ही जबाबदारी सोपवण्यात आली नाही.
टाईम्स ऑफ इंडियाच्या रिपोर्टनुसार झहीरला गोलंदाजीचा पूर्णवेळ प्रशिक्षक म्हणून नियुक्त करण्याची बीसीसीआयची इच्छा होती. मात्र झहीर पूर्णवेळ प्रशिक्षकपदाची जबाबदारी घेण्यास तयार नव्हता. तसेच झहीरने 100 दिवसांसाठी 4 कोटी रुपयांची मागणी केली होती.
मंडळाच्या माहितीनुसार हा करार महागडा असल्याने त्यांनी झहीरच्या मागण्या फेटाळल्या. त्यामुळेच झहीर टीम इंडियाचा गोलंदाजी प्रशिक्षक बनू शकला नाही.