फ्लिंटॉफ असं काही बोलला ज्यामुळे युवराज भडकला आणि ठोकले ६ बॉलमध्ये ६ सिक्स

युवराज सिंग म्हणून भडकला

Updated: Apr 26, 2016, 07:13 PM IST
फ्लिंटॉफ असं काही बोलला ज्यामुळे युवराज भडकला आणि ठोकले ६ बॉलमध्ये ६ सिक्स title=

मुंबई : युवराज सिंगने टी-20 वर्ल्डकपमध्ये इंग्लंडच्या विरोधात स्टुअर्ट ब्रॉडच्या ओव्हरमध्ये ६ बॉलमध्ये मारलेले ६ सिक्स कोणीच विसरले नसतील. युवराजच्या या खेळीमुळे भारताने २० ओव्हरमध्ये ४ विकेट गमवत २१८ रन्सचं स्कोर उभा केला होता. 

युवराजने हे ६ सिक्स रागाच्या भरात मारले होते पण फ्लिंटॉफ असं काय बोलला होता ज्यामुळे युवराज ऐवढा भडकला होता हे तुम्हाला माहित नसेल. युवराजने सिमी गरेवालला दिलेल्या एका इंटरव्ह्यूमध्ये याबाबत खुलासा केला आहे.

युवराज बोलला की, फ्लिंटॉफने त्याच्या शॉट्सला खराब ठरवलं होतं. यावर त्याला ऐवढा राग आला की त्याने फ्लिंटॉफलाच तू खराब असल्याचं म्हणून टाकलं. युवराजने हे उत्तर दिल्यानंतर फ्लिंटॉफने त्याचा गळा कापण्याची भाषा केली. हातात असलेल्या बॅटने देखील मारण्याची भाषा त्यावेळेस फ्लिंटॉफने केली. असा खुलासा युवराज सिंग याने केला आहे.

पाहा व्हिडिओ