चंदीगड : क्रिकेटर युवराज सिंग आणि त्याची मैत्रिण हेजल किच यांचा गूपचूप इंडोनेशियातील बाली येथे साखरपुडा झाल्याचे वृत्त आले. मात्र हेजलने यावर मौन पाळले. तर दुसरीकडे वडिलांनीही सिक्सर मारलाय. मला त्याच्या साखरपुड्याचे माहित नाही. परंतु त्याची आई शबनम खूश आहे, अशी प्रतिक्रिया युवीचे वडील योगराज सिंग यांनी दिलेय.
युवराजच्या साखरपुड्याबाबत मला इकडू-तिकडून समजले. मात्र, त्याच्या साखरपुड्याबाबत आपल्याला काहीही माहीती नाही. युवराजचे वडील योगराज सिंग आणि आई शबनम यांचा काहीवर्षांपूर्वीच घटस्फोट झालाय. योगराज यांनी दूरध्वनीवर 'जागर'शी बोलताना सांगितले, ती अमृतसर येथे राहते. मला युवराजच्या साखरपुड्याबाबत कोणतीही सूचना मिळालेली नाही. मला बाहेरुन समजलेय. ज्यावेळी मला समजेल त्यावेळी मी बोलेन, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.
योगराज सिंग पंजाबी सिमेमातील प्रसिद्ध कलाकार आहेत. ते सध्या अमृतसरमध्ये सिनेमा शुटींगमध्ये व्यस्त आहेत. दरम्यान, युवीने हेजल हिची भेट काही दिवसांपूर्वी घालून दिली होती. त्याआधी अभिनेत्री दीपिका पादुकोण, किम शर्मा यांच्यासोबत युवीचे नाव जोडले गेले होते. हेजलच्या भेटीनंतर युवीच्या पसंतीला त्यांनी होकार दिला होता. ते हेजलला भेटून प्रभावीत झाले होते.
दरम्यान, युवीची आई शबनम हिने सांगितले, तुम्ही जे ऐकले आहेत, ते खरे आहे. मी खूप आनंदी आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.