मुंबई : आयपीएलमध्ये लागोपाठ ११ सामने गमाविलेल्या दिल्ली डेअरडेव्हिल्सला एका लकची गरज होती. ते लक सिक्सर किंग युवराज सिंग याने मिळवून दिले आहे. युवराज सिंगने आपल्या जर्सीचा क्रमांक बदलला आणि दिल्लीला पहिला विजय मिळाला.
आयपीएल सीझन आठ मध्ये युवराज सिंगने दिल्ली डेअर डेव्हिल्सकडून खेळताना सर्वात महाग खेळाडू म्हणून खेळण्यास सुरूवात केली.
यापूर्वी युवराज १२ क्रमांकाची जर्सी घालत होता. १२ क्रमांकाची जर्सी घालून त्याने धमाल केली होती. पण दिल्लीकडून खेळताना त्याने जर्सीचा क्रमांक बदलून ३ केला आहे.
दिल्ली पहिल्या दोन सामन्यात युवराजच्या बदललेल्या जर्सीची कमाल पाहू शकली नाही. पण पंजाब विरूद्धच्या सामन्यात युवराजला लय सापडली. युवराजने ३९ चेंडूत पाच चौकार आणि तीन षटकारांसह ५५ धावा केल्या आणि दिल्लीच्या संघाला पाच विकेटने विजय मिळवून दिला.
युवराजने मयांक अग्रवालसह विजयी भागिदारी केली नसती तर दिल्लीचा हा सलग १२ वा पराभव असता. सलग हारण्याचा हा क्रम १२ सामन्यांपर्यंत येऊन पोहचला होता. जो युवराजच्या जर्सीचा क्रमांक होता.
पंजाबवर विजयानंतर युवराजला या बाबत विचारले असता तो हसत म्हणाला. माझ्या जर्सीतील १२ आकड्यातील १ आणि २ एकत्र करून ३ हा आकडा तयार झाला आहे. जर्सी बदलण्याबाबत युवराज म्हणाला, की दिल्लीकडून क्विटन डी कॉकने १२ क्रमांकाची जर्सी घातली आहे. त्यामुळे मी आपला क्रमांक बदलला.
आता या बदललेल्या जर्सीमुळे युवराज टीमचे भाग्य बदलेल हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.