दिलशान-संगकारानं धमाकेदार बॅटिंगने तोडले अनेक रेकॉर्ड्स

श्रीलंकन टीम अफगाणिस्तानविरुद्ध मिळवलेल्या विजयाचा मोमेंटम कायम राखत आज बांग्लादेशविरुद्ध अगदी वेगळा खेळ दाखवला. श्रीलंकेच्या टीमनं आज दमदार खेळी करत अनेक रेकॉर्ड्स मोडलेत. बांग्लादेशसमोर ३३३ रन्सचं टार्गेट अवघ्या तीन खेळाडूंनी ठेवलं.

Updated: Feb 26, 2015, 04:23 PM IST
दिलशान-संगकारानं धमाकेदार बॅटिंगने तोडले अनेक रेकॉर्ड्स title=

मेलबर्न: श्रीलंकन टीम अफगाणिस्तानविरुद्ध मिळवलेल्या विजयाचा मोमेंटम कायम राखत आज बांग्लादेशविरुद्ध अगदी वेगळा खेळ दाखवला. श्रीलंकेच्या टीमनं आज दमदार खेळी करत अनेक रेकॉर्ड्स मोडलेत. बांग्लादेशसमोर ३३३ रन्सचं टार्गेट अवघ्या तीन खेळाडूंनी ठेवलं.

दिलशानं आज धमाकेदार १६१ रन्स केले तर संगकारानं १०५ रन्स. थिरिमाने ५२ रन्सची खेळी केली.

पाहा कोणकोणते रेकॉर्ड्स श्रीलंकेनं आजच्या मॅचने तोडले -

१. Highest स्कोअर - दिलशानं आद आपल्या वनडे कारकीर्दीतील सर्वाधिक स्कोअर केलाय. दिलशानने १६१ रन्सची नॉटआऊट खेळी दरम्यान २२ चौकार लावले. यापूर्वी दिलशाननं भारताविरुद्ध १६० रन्सची खेळी केली होती.

२. World Cup highest स्कोअर - तिलकरत्ने दिलशाने आज १६१ रन्स बनवून श्रीलंकेकडून वर्ल्डकपमध्ये सर्वाधिक अरविंदा डिसिल्वाच्या १४५ रन्सना मागे सोडलंय. डिसिल्वानं १९९६मध्ये केनिया विरुद्ध हा स्कोअर बनवला होता. जो १९ वर्षानंतर दिलशानने तोडला. आता दिलशान श्रीलंकेसाठी वर्ल्डकपमध्ये एका खेळीत सर्वाधिक रन्स बनवणारा क्रिकेटपटू बनलाय. 

३. Highest पार्टनरशिप - तिलकरत्ने दिलशान आणि कुमार संगकाराने मिळून दुसऱ्या विकेटसाठी २१० रन्सची पार्टरशिप केली. दुसऱ्या विकेटसाठी श्रीलंकेची ही आतापर्यंतची बेस्ट पार्टनरशिप आहे. यापूर्वी संगकारा आणि दिलशानच्या नावावरच भारताविरुद्ध २०० रन्सची पार्टनरशिपचा रेकॉर्ड होता. 

४. मोस्ट सेंच्युरी - तिलकरत्ने दिलशानने वर्ल्डकपमध्ये श्रीलंकेकडून ओपनिंग करतांना आज तिसरी सेंच्युरी ठोकली. यासोबतच त्यानं वर्ल्डकपमध्ये आपल्या टीमचाच ओपनर जयासूर्याच्या वर्ल्डकपमध्ये ३ सेंच्युरीचा रेकॉर्डचीही बरोबरी केलीय.

५. ४००वी वनडे - कुमार संगकाराने आज आपल्या वनडे करिअरमधील ४०० वी मॅच खेळली. ४००व्या वनडे मॅचमध्ये सेंच्युरी ठोकणारा संगकारा पहिला बॅट्समन ठरलाय. यापूर्वी या आकड्यापर्यंत सचिन तेंडुलकर, सनत जयसूर्या आणि महेला जयवर्धने पोहोचले, त्यांनी ४०० वनडे खेळल्या आहेत. मात्र यापैकी कुणीही ४००व्या मॅचमध्ये सेंच्युरी केली नाही. संगकारानं हा कारनामा आज करून दाखवलाय. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.