मुंबई : क्रिकेट वर्ल्ड कपच्या फायनलमध्ये भारत धडक मारणार आहे. बांगलादेशविरूद्धची क्वार्टर फायनलची मॅच होण्याआधीच सट्टेबाजारात हा अंदाज व्यक्त केला जातोय. याचाच अर्थ बांगलादेश विरूद्धची क्वार्टर फायनल भारत जिंकणार, असंच सट्टेबाजांचं भाकित आहे.
एकीकडं क्रिकेट वर्ल्ड कपची उत्कंठा वाढत असताना, मुंबईत वर्ल्ड कपवर होणारी बेटिंग कमी झालीय. मुंबई हा एकेकाळी बेटिंगचा अड्डा होता. आता हैदराबाद हे बेटिंगचं मोठं सेंटर बनलंय.. एवढंच नव्हे तर विदेशातून आता बेटिंगची सूत्रं हलवली जातायत.
क्वार्टर फायनलमध्ये आज टीम इंडिया मेलबर्नमध्ये बांग्लादेशशी भिडणार आहे. धोनी एँड कंपनीची वर्ल्ड कपमधील आत्तापर्यंतची वाटचाल पाहता, बांग्लादेशविरुद्ध टीम इंडिया विजय साकारत सेमी फायनल गाठेल अशी आशा भारतीय क्रिकेट फॅन्सना वाटतेय.
वर्ल्ड कपमध्ये आत्तापर्यंत अपराजित राहिलेल्या टीम इंडियाची क्वार्टर फायनलमध्ये टक्कर बांग्लादेशशी होणार आहे. टीम इंडियाच्या तुलनेत बांग्लादेश जरी अनुभवी टीम नसली तरी मोठ्या टीम्सला धुळ चारण्याची क्षमता बांग्लादेशमध्ये आहे. बांग्लादेशमुळेच 2007वर्ल्ड कपमध्ये टीम इंडियाचं आव्हान पहिल्याच राऊंडमध्ये संपुष्टात आलं होत.
या वर्ल्ड कपमध्येही लीग राऊंडमध्येच इंग्लंडला पराभूत करत त्यांचही आव्हान बांग्लादेशनचं संपुष्टात आणलं. याचबरोबर दक्षिण आफ्रिकेलाही विजयासाठी बांग्दालेशाने चांगलाच संघर्ष करायला भाग पाडलं. यामुळेच बांग्लादेशकडून टीम इंडियाला सावधच रहावं लागेल. ओपनिंग भारतासाठी चिंतेची बाब आहे. आत्तापर्यंत एकदाच रोहित-धवनने चांगली ओपनिंग दिलीय. रोहितला अद्यापही मोठी खेळी साकारता आलेली नाही.
झिम्बाब्वेविरुद्ध कोहली आणि रहाणेला रन्स करता आल्या नव्हत्या. दरम्यान धोनी आणि रैनाने चांगली खेळी केली होती. तर जाडेजाला बॅटींगमध्ये कमाल करता आलेली नाही. भारतीय बॉलर्स चांगली कामगिरी करत असले तरी गेल्या मॅचमध्ये स्पिनर्सना चांगलाच मार पडला होता. दरम्यान शमी, यादव आणि मोहित शर्मा फास्ट बॉलिंगमध्ये कोणाला टीका करण्याची संधी देत नाहीयेत. बांग्लादेशचा बॅट्समन महमुदुल्लाहसाठी भारतीय बॉलर्सना खास स्ट्रेटेजी आखावी लागणार आहे. त्याने आत्तापर्यंत दोन सेंच्युरी झळकावल्या आहेत.
विशेष म्हणजे इंग्लंड आणि न्यूझीलंडसारख्या टीम्सविरुद्ध त्याने सेंच्युरी झळकावलीय. तर शकिब उल हसनच्या रुपात एक चांगला ऑल राऊंडर त्यांच्याकडे आहे. बांग्लादेशविरुद्ध जर चांगली रणनिती आखली तर क्वार्टर फायनलचा अडथळा पार करणं धोनी एँड कंपनीला अवघड जाणार नाही आणि टीम इंडिया सेमी फायनलमध्ये धडक मारेल अशीच आशा वाटतेय.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.