'हॉकीच्या जादूगाराला' वाढदिवसाची 'रिओ ऑलिम्पिक' भेट!

भारतीय महिला हॉकी टीम २०१६ रिओ ऑलिम्पिकसाठी पात्र ठरलीय.

Updated: Aug 29, 2015, 02:19 PM IST
'हॉकीच्या जादूगाराला' वाढदिवसाची 'रिओ ऑलिम्पिक' भेट! title=

नवी दिल्ली : भारतीय महिला हॉकी टीम २०१६ रिओ ऑलिम्पिकसाठी पात्र ठरलीय.

विशेष म्हणजे भारतीय महिला टीम दुसऱ्यांना ऑलिम्पिकसाठी पात्र ठरलीय. यापूर्वी १९८० मध्ये भारतीय महिला हॉकी टीम ऑलिम्पिकमध्ये खेळली होती. 

उल्लेखनीय म्हणजे, ज्या दिवशी सगळा देश हॉकीचा जादूगार मेजर ध्यानचंद यांचा वाढदिवस 'राष्ट्रीय खेळ दिवस' म्हणून साजरा करत होता, त्याच दिवशी ही गोड बातमी मिळालीय. 

युरो हॉकी चॅम्पियनशिपमध्ये इंग्लंडनं सेमी फायनलमध्ये स्पेनला पराभूत केल्यानंतर भारतीय महिला हॉकी टीमनं रिओ ऑलिम्पिकसाठी तिकीट निश्चित केलय. 

दरम्यान, रिओ ऑलिम्पिकसाठी पात्र ठरणारी भारतीय हॉक टीम दहावी टीम ठरलीय. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.