वर्मस्लेः आठ वर्षांनंतर पहिल्यांदा टेस्ट क्रिकेट खेळणाऱ्या भारतीय महिला क्रिकेट टीमने दुसऱ्या डावात कर्णधार मिताली राज ( नाबाद ५०) आणि स्मृती मंधाना (५१) यांच्या अर्धशतकी खेळीच्या जोरावर सर पॉल गेट्टी ग्राऊंडवर खेळण्यात आलेल्या एक मात्र चार दिवसीय टेस्ट मॅचमध्ये इंग्लडला सहा विकेटने पराभूत केले. या विजयामुळे भारतीय महिलांनी इंग्लडच्या भूमीवर अपराजीत राहण्याचा रिकॉर्ड कायम ठेवले आहे.
सामन्याच्या शेवटच्या आणि चौथ्या दिवशी भारतीय संघाला जिंकण्यासाठी ६२ रन्सची आवश्यकता होती आणि त्यांच्याकडे सहा विकेट बाकी होते. त्यावेळी मिताली आणि शिखा पांडे यांनी पाचव्या विकेटसाठी ५८ धावांची भागीदारी करून भारताला विजय मिळवून दिला आणि इंग्लडमध्ये भारताची लाज राखली.
मिताली संयमी खेळी खेळत १५७ बॉल्समध्ये चार चौकारांसह ५० धावा केल्या तर शिकाने १०६ बॉल्सचा सामना केला.
यापूर्वी इंग्लडची टीम दुसऱ्या डावात २०२ रन्स बनवून आऊट झाली होती. त्यामुळे भारताला जिंकण्यासाठी १८१ रन्सचे लक्ष्य होते. तिसऱ्या दिवसाच्या शेवटी पूनम राऊत १६ आणि हरमनप्रीत कौर शून्यावर बाद होऊन तंबूत परतल्या. यावेळी इंग्लड सामन्यात परत आल्याचे वाटत होते. पण मिताली आणि शिखाने चौथ्या दिवशी खेळ सावरला.
दुसऱ्या डावात भारताकडून पहिल्या विकेटसाठी तिरुश कामिनी आणि स्मृती यांच्या ७६ धावांची भागीदारी झाली.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.