विम्बल्डन : रॉजर फेडरर - नोवाक जोकोविच आमने-सामने, पेस पराभूत

माजी वर्ल्ड नंबर वन रॉजर फेडरर आणि नोवाक जोकोविच हे विम्बल्डनच्या फायनलमध्ये आमने-सामने उभे ठाकणार आहेत. तर भारताच्या लिएंडर पेस जोडीला पराभव पत्करावा लागला, 

AP | Updated: Jul 5, 2014, 07:50 AM IST
विम्बल्डन : रॉजर फेडरर - नोवाक जोकोविच आमने-सामने, पेस पराभूत title=

लंडन : माजी वर्ल्ड नंबर वन रॉजर फेडरर आणि नोवाक जोकोविच हे विम्बल्डनच्या फायनलमध्ये आमने-सामने उभे ठाकणार आहेत. तर भारताच्या लिएंडर पेस जोडीला पराभव पत्करावा लागला, 

फेडररने कॅनडाच्या मिलॉस राओनीचला 6-4, 6-4, 6-4ने पराभूत करत फायनलमध्ये धडक मारलीय. तर जोकोविचने बल्गेरियाच्या ग्रिगोर दिमत्रोवचे आव्हान चार सेटमध्ये परतवून लावत फायनल गाठलीय. फेडररने तब्बल सातवेळा विम्बल्डनच्या विजेतेपदाला गवसणी घातलीय. फेडररने नवव्यांदा फायनलमध्ये धडक मारली असून विंबल्डनच सात वेळा अजिंक्यपद पटकावलय. तर जोकोविचने तिस-यांदा फायनलमध्ये प्रवेश केलाय. 

भारताचा अव्वल टेनिस प्लेअर लिएंडर पेस आणि त्याचा चेक गणराज्यचा जोडीदार राडेक स्टेपनिकला डबल्सच्या सेमी फायनलमध्ये पराभवाला सामोर जाव लागलय. याचबरोबर विम्बल्डनमधील भारताच आव्हानही संपुष्टात आल. पेस-स्टेपनिकला कॅनडा-अमेरिकेची जोडी वासेक पोसपिसिल आणि जॅक सॉकने 6-7, 3-6, 4-6ने पराभूत केल. 

चेक गणराज्याची 2011ची विजेती पेट्रो क्विटोवा आणि कॅनडाची यूजनी बुचार्ड यांच्यामध्ये यंदाची विम्बल्डन फायनल रंगणार आहे. सहाव्या सीडेड क्विटोवाने सेमी फायनलमध्ये आपल्याच देशाच्या साफारोवाला 7-6, 6-1ने पराभूत करत फायनलमध्ये प्रवेश केला. 

तर तेराव्या सीडेड बुचार्डने सेमी फायनलमध्ये रोमानियाच्या सिमोना हालेपवर 7-6, 6-2ने विजय मिळवत फायनलमध्ये धडक मारली. 2011मध्ये पेट्रो क्विटोवाने शारापोव्हाला पराभवाचा धक्का देत विजेतेपदाला गवसणी घातली होती. म्हणून तिच विजयाची प्रबळ दावेदार मानली जात आहे.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*  झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.