रिओ : रिओ ऑलिम्पिकमध्ये भारताच्या पदकांचा दुष्काळ महिला कुस्तीपटू साक्षी मलिकने संपवला. तिने कुस्तीमध्ये कांस्यपदक पटकावत पदकांचे खाते खोलले.
त्यानंतर भारताची बॅडमिंटन स्टार पी.व्ही. सिंधूने भारतीय बॅडमिंटन जगतात नवा इतिहास रचत रौप्यपदकाला गवसणी घातली. साक्षी आणि सिंधूच्या पदकामुळे भारताच्या खात्यात दोन पदके जमा झालीत.
उद्या ऑलिम्पिक स्पर्धेचा शेवटचा दिवस असणार आहे. साऱ्या भारतीयांचे लक्ष कुस्तीपटू योगेश्वर दत्तवर असेल. २०१२च्या लंडन ऑलिम्पिकमध्ये योगेश्वरने कांस्यपदक मिळवले होते.
त्यामुळे यंदाही चांगली कामगिरी करत योगेश्वर भारताच्या खात्यात आणखी एका पदकाची भर घालेल अशी समस्त भारतीयांना आशा आहे. त्याचा सामना रविवारी ५ वाजता होणार आहे.