म्हणून विराट घालतो 18 नंबरची जर्सी

भारताचा बॅट्समन विराट कोहली हा सध्याचा जगातला सर्वोत्तम बॅट्समन आहे. जगभरामध्ये कोहलीचे असंख्य फॅन्स आहेत. 

Updated: Jun 30, 2016, 05:17 PM IST
म्हणून विराट घालतो 18 नंबरची जर्सी  title=

मुंबई : भारताचा बॅट्समन विराट कोहली हा सध्याचा जगातला सर्वोत्तम बॅट्समन आहे. जगभरामध्ये कोहलीचे असंख्य फॅन्स आहेत. विराट कोहलीबाबतच्या वेगवेगळ्या गोष्टी ऐकण्यामध्ये या फॅन्सना नेहमीच उत्सुकता असते. विराट कोहली मैदानात उतरताना नेहमी 18 नंबरची जर्सी वापरतो. 

18 नंबरची जर्सी वापरण्यामध्ये विराट कोहलीचं भावनिक कारण आहे. विराट कोहली त्याच्या वडिलांच्या बराच जवळ होता. 18 डिसेंबर 2006ला विराट कोहलीच्या वडिलांचा मृत्यू झाला, म्हणून विराट 18 नंबरची जर्सी घालून मैदानात उतरतो. वडिलांचा मृत्यू झाल्यानंतर लगेचच कोहली कर्नाटकविरुद्धच्या रणजी मॅचसाठी मैदानात उतरला होता. 

या कारणामुळेच विराट अंडर 19 पासून 18 नंबरची जर्सी घालतो. विराटच्या घरी त्याची आई, मोठा भाऊ विकास आणि एक लहान बहिण भावना आहे.