म्हणून दिसत नाही भारताची प्रॅक्टिस मॅच

टी-20 वर्ल्ड कपला भारतामध्ये सुरुवात झाली आहे. मंगळवारी कोलकात्याच्या इडन गार्डनवर भारत वेस्ट इंडिज यांच्यामध्ये प्रॅक्टिस मॅच झाली.

Updated: Mar 12, 2016, 06:49 PM IST
म्हणून दिसत नाही भारताची प्रॅक्टिस मॅच title=

मुंबई: टी-20 वर्ल्ड कपला भारतामध्ये सुरुवात झाली आहे. मंगळवारी कोलकात्याच्या इडन गार्डनवर भारत वेस्ट इंडिज यांच्यामध्ये प्रॅक्टिस मॅच झाली. पण ही मॅच टीव्हीवर लाईव्ह दाखवण्यात आली नाही. यामुळे असंख्य क्रिकेट चाहते नाराज झाले. 

प्रॅक्टिस मॅच न दाखवता, अफगाणिस्तान आणि हाँगकाँग या दोघांची क्वालिफायिंग मॅच स्टार स्पोर्ट्सवर दाखवण्यात आली. सीसीटीव्हीचं सनसेट प्लस वाईन यांच्याकडे यंदाच्या टी 20 वर्ल्ड कपच्या प्रॉडक्शनचे तर स्टार स्पोर्ट्सकडे प्रसारणाचे हक्क आहेत.

2007 नंतर पहिल्यांदाच भारताच्या प्रॅक्टिस मॅच यंदा दाखवण्यात आल्या नाहीत. या टी20 वर्ल्ड कपमधल्या क्वालिफायिंग मॅच या आंतरराष्ट्रीय मॅच आहेत, या मॅचचं महत्त्व कमी होऊ नये यासाठी प्रॅक्टिस मॅच न दाखवण्याचा निर्णय घेण्यात आला, अशी प्रतिक्रिया आयसीसीनं दिली आहे.

आयसीसीनं घेतलेल्या या निर्णयामुळे शनिवारची भारत आणि दक्षिण आफ्रिकेची प्रॅक्टिस मॅचही क्रिकेट चाहत्यांना बघता येणार नाही.