'शारापोवा क्रिकेटच्या देवाला ओळखत नाही, ती 'नास्तिक' असेल'

स्टार टेनिस खेळाडू मारिया शारापोवावर सचिनचे फॅन्स संतापले आहेत, कारण सचिन तेंडुलकर कोण आहे? हे आपल्याला माहित नाही असं शारापोवाने म्हटलंय.

Updated: Jul 3, 2014, 07:32 PM IST
'शारापोवा क्रिकेटच्या देवाला ओळखत नाही, ती 'नास्तिक' असेल' title=

लंडन : स्टार टेनिस खेळाडू मारिया शारापोवावर सचिनचे फॅन्स संतापले आहेत, कारण सचिन तेंडुलकर कोण आहे? हे आपल्याला माहित नाही असं शारापोवाने म्हटलंय.

शारापोवा ब्रिटेनमध्ये होणाऱ्या विम्बल्डन टेनिस टुर्नामेंटच्या एका सामन्यानंतर मीडियाशी बोलत होती.

सचिन तेंडुलकर कोण आहे, हे माहित नाही, असं शरापोवाने म्हटल्यानंतर ट्वीटर आणि फेसबुकवर शारापोवा विरोधात प्रतिक्रिया येऊ लागल्या. शारापोवाच्या ऑफिशीयल फेसबुक पेजवर आतापर्यंत 20 हजार पेक्षा जास्त प्रतिक्रिया आल्या आहेत.

हु इज मारिया शरापोवा?
ट्वीटवर #WhoisMariaSharapova म्हणजे मारिया शारापोवा कोण आहे, हा हॅशटॅग सर्वात ज्यास्त ट्रेंड करणार हॅशटॅग झाला आहे. सचिनच्या चाहत्यांनी या हॅशटॅग नुसार शारापोवा विरोधात प्रतिक्रिया दिल्या आहेत.

शारापोवा विरोधात एवढ्या तिखट प्रतिक्रिया आल्या आहेत की, एकाने म्हटलंय ''अरे 'देवा' सचिन, तुला मारिया ओळखत नाही, ती 'नास्तिक' असेल'', काही प्रतिक्रियांमध्ये शारापोवाचा बचावही करण्यात आलाय.

मारियाला का विचारला सचिनचा प्रश्न?
यंदाचं फ्रेंच ओपन जिंकणाऱ्या शरापोवाला विचारण्यात आलं की, सेंटर कोर्टच्या रॉयल बॉक्समध्ये कोण कोणते मोठे स्टार उपस्थित होते?

या प्रश्नाचं उत्तर देतांना मारिया शारापोवा म्हणाली डेविड बेकम एक शानदार व्यक्तिमत्व आहे, मात्र जेव्हा तिला रॉयल बॉक्समध्ये उपस्थित असलेल्या सचिन तेंडुलकरविषयी विचारण्यात आलं तेव्हा मारियाने दिलेलं उत्तर कोट्यवधी भारतीयांना हैराण करणार होतं, कारण तिला सचिन तेंडुलकर कोण हे माहितच नव्हतं.

सचिन तेंडुलकर टेनिसचा चाहता आहे. नेहमी विम्बल्डनचे सामने पाहण्यासाठी सचिन लंडनला जात असतो. टेनिस इतिहासातील महान खेळाडू समजले जाणारे रॉजर फेडररही सचिन तेंडुलकरला ओळखतो. 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.