आपले नाव जर्सीवर पाहून भावूक झाली धोनीची आई

न्यूझीलंडविरुद्धच्या पाचव्या आणि अखेरच्या वनडे सामन्यात टीम इंडियाने आपल्या आईच्या नावाची जर्सी घातली होती. नयी सोच या उपक्रमांतर्गत ही नवी कल्पना शेवटच्या वनडेत राबवण्यात आली होती. प्रत्येक खेळाडूसाठी आपल्या आईच्या नावाची जर्सी परिधान करणे हा अत्युच्च अभिमानाचा क्षण होता.

Updated: Nov 3, 2016, 11:52 AM IST
आपले नाव जर्सीवर पाहून भावूक झाली धोनीची आई title=

मुंबई : न्यूझीलंडविरुद्धच्या पाचव्या आणि अखेरच्या वनडे सामन्यात टीम इंडियाने आपल्या आईच्या नावाची जर्सी घातली होती. नयी सोच या उपक्रमांतर्गत ही नवी कल्पना शेवटच्या वनडेत राबवण्यात आली होती. प्रत्येक खेळाडूसाठी आपल्या आईच्या नावाची जर्सी परिधान करणे हा अत्युच्च अभिमानाचा क्षण होता.

क्रिकेटपटूंप्रमाणेच त्यांच्या आईंचीही हीच भावना होती. या नव्या विचाराबाबत धोनीसह अनेक क्रिकेटपटूंच्या आईने त्यांच्या भावना व्यक्त केल्या.

स्वत:चे नाव आपल्या मुलाच्या जर्सीवर पाहून धोनीच्या आईने केवळ एकच वाक्य म्हटले ते म्हणजे अच्छा लगता है. या तीन शब्दांमधून त्यांनी आपले धोनीबद्दलचे प्रेम व्यक्त केले. 

बुमराहची आई म्हणाली, जेव्हा मला माझ्या भावाने सांगितले की सामन्यात प्रत्येक खेळाडूने आपल्या आईच्या नावाची जर्सी घातलीये तेव्हा तो क्षण खरोखरच भावुक होता. 

माझ्या मुलाच्या जर्सीवर मी जेव्हा माझे नाव पाहिले तेव्हा तो क्षण माझ्यासाठी मोठा अभिमानाचा क्षण होता. त्याच्यामुळे माझे नाव जगभरात पोहोचले, असे त्या पुढे म्हणाल्या.