सचिनसाठी अंजली तेंडुलकर जेव्हा पत्रकार होतात...

सचिन तेंडुलकरचं आत्मचरित्र 'प्लेइंग इट माय वे' या पुस्तकाचं बुधवारी मुंबईत प्रकाशन झालं, यावेळी सचिन आणि सचिनच्या जवळ असणाऱ्या व्यक्तींनी सचिनसोबतच्या आठवणींना उजाळा दिला आणि सचिनच्या आणखी काही गंमतीदार आठवणी समोर आल्या.

Updated: Nov 5, 2014, 09:08 PM IST
सचिनसाठी अंजली तेंडुलकर जेव्हा पत्रकार होतात... title=

मुंबई : सचिन तेंडुलकरचं आत्मचरित्र 'प्लेइंग इट माय वे' या पुस्तकाचं बुधवारी मुंबईत प्रकाशन झालं, यावेळी सचिन आणि सचिनच्या जवळ असणाऱ्या व्यक्तींनी सचिनसोबतच्या आठवणींना उजाळा दिला आणि सचिनच्या आणखी काही गंमतीदार आठवणी समोर आल्या.

अंजली पत्रकार बनून पहिल्यांदा सचिनच्या घरी
पुस्तक प्रकाशन सोहळ्यात सचिन तेंडुलकर यांची पत्नी अंजली तेंडुलकर देखिल हजर होत्या, यावेळी अंजली पहिल्यांदा सचिन तेंडुलकर यांच्या घरी पत्रकार म्हणून गेल्याचं अंजली तेंडुलकर यांनी यावेळी सांगितलं.

यावेळी अंजली तेंडुलकर यांनी एक आठवण सांगितलं, सचिनने आपल्याला पाहिल्यांदा सांगितलं होतं, की एक मुलगी म्हणून तू माझ्या घरी आली तरं मला थोडं अडचणीचं वाटेल, म्हणून तू एक पत्रकार म्हणून माझ्याघरी येऊ शकते, म्हणून मी पहिल्यांदा पत्रकार म्हणून सचिनच्या घरी गेली.

तो नारंगी रंगाचा टी-शर्ट
अंजली यांनी सांगितलं की सचिनसोबत आपली पहिली भेट झाली तेव्हा आपण नारंगी रंगाचा टी-शर्ट घातला होता, तो आजही आपण आठवण म्हणून जपून ठेवला आहे. या कार्यक्रमात सुनील गावस्कर, दिलीप वेंगसरकर, रवी शास्त्री, सौरभ गांगुली, राहुल द्रविड, व्हीव्हीएस लक्ष्मणसह अनेक दिग्गज उपस्थित होते.

सचिनच्या आत्मचरित्राचं प्रकाशन
सचिन तेंडुलकरचं आत्मचरित्र 'प्लेइंग इट माय वे' या पुस्तकाचं बुधवारी मुंबईत प्रकाशन झालं. सचिनने आपल्या आत्मचरित्राची पहिली प्रत आपली आई रजनी यांना भेट दिली. आपल्या आईला हे पुस्तक भेट दिल्यानंतर आईच्या चेहऱ्यावरील तो क्षण गौरवपूर्ण आणि अनमोल  होता, असं  सचिनने ट्ववीट करून सांगितलंय.

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.