कोलकाता : टी-२० वर्ल्डकपच्या अंतिम सामन्यात विजयाचा हिरो ठरलेल्या वेस्ट इंडिजच्या मार्लन सॅम्युअल्सने सामन्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत असभ्यपणाचे वर्तन केले. सॅम्युअल्स पत्रकार परिषदेदरम्यान टेबलावर पाय ठेवत त्याने पत्रकारांशी बातचीत केली.
त्याचे हे फोटो सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होतायत. इंग्लंडविरुद्धच्या अंतिम सामन्यात सॅम्युअल्सने ६६ चेंडूत ८५ धावांची खेळी केली होती. त्याच्या या खेळीमुळे वेस्ट इंडिजला पुन्हा विश्वविजेतेपदावर नाव कोरता आले.
सॅम्युअल्सचा सामनावीराचा पुरस्कारही देण्यात आला.