वेस्टइंडीजनं बांग्लादेशला 10 विकेटनं हरवलं

मुशफिकुर रहीमच्या सेंच्युरीनंतरही वेस्टइंडिजनं पहिल्याच टेस्टच्या पाचव्या आणि अखेरच्या दिवशी आज बांग्लादेशला लंचपूर्वीच 10 विकेटनं हरवलं. 

Updated: Sep 10, 2014, 01:22 PM IST
वेस्टइंडीजनं बांग्लादेशला 10 विकेटनं हरवलं title=

किंग्सटन: मुशफिकुर रहीमच्या सेंच्युरीनंतरही वेस्टइंडिजनं पहिल्याच टेस्टच्या पाचव्या आणि अखेरच्या दिवशी आज बांग्लादेशला लंचपूर्वीच 10 विकेटनं हरवलं. 

वेस्टइंडिजच्या फिल्डर्सनं कालसारख्याच आजही कॅच घेतल्या पण अखेर यजमान बांग्लादेशला फॉलोऑनच्या दुसऱ्या इनिंगमध्ये 314 रन्सवर आऊट व्हावं लागलं. मुशफिकुरनं 116 रन्स केले आणि तो आऊट होणारा अखेरचा बॅट्समन ठरला. 

वेस्टइंडिजला जिंकण्यासाठी 13 रन्स हवे होते आणि क्रिस गेलनं (नॉटआऊट नऊ) आणि मॅन ऑफ द मॅच क्रेग ब्रेथवेट (नॉटआऊट 04) रन्स करून तिसऱ्या ओव्हरमध्येच टीमला विजय मिळवून दिला. ब्रेथवेटला पहिल्या इनिंगमध्ये 212रन्स केले म्हणून मॅन ऑफ द मॅच निवडलं गेलं. 

यापूर्वी बांग्लादेशच्या टीमनं आज पाच विकेटवर 256 रन्सवरून पुढे खेळायला सुरूवात केली. टीमला इनिंगचा पराभव टाळण्यासाठी 46 रन्सची गरज होती. टीम यात यशस्वी झाली. दरम्यान कॅप्टन मुशफिकुरनं सेंच्युरी पूर्ण केली. मात्र उर्वरित टीम गडगडली. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.