नवी दिल्ली : टीम इंडियाचा सर्वात मोठा फॅन समजला जाणाऱ्या सुधीर गौतमवर ढाक्यात हल्ला झाला, ज्यात तो थोडक्यात बचावलाय. सुधीर भारत-बांग्लादेश दरम्यानचा दुसरा एकदिवसीय सामना पाहायला चालला होता. याचवेळी त्याच्यावर दगडफेक झाली. सुधीरनं दोन पोलिसांच्या मदतीनं आपला जीव वाचवला.
सुधीरच्या म्हणण्यानुसार जेव्हा तो ऑटोमध्ये बसणार होता, तेव्हा अचानक त्याच्यावर गर्दीतून दगड फेकले गेले. काही लोकांनी तो बसलेल्या ऑटोचे पडदेही फाडले. गर्दीतून लोक ओरडत होते, 'आम्ही मेलबर्नच्या मैदानावरील विश्वचषक क्वार्टरफायनल सामन्यातील पराभवाचा बदला घेतलाय आणि आता मैदानाबाहेरही घेणार आहोत.' यापूर्वी माझ्या आयुष्यात अशाप्रकारचा प्रसंग आला नव्हता, असंही तो म्हणाला. सुधीरनं क्रिकेट अॅडवायजरी कमिटी आणि सचिन तेंडुलकर भारतीय क्रिकेटला या साऱ्यापासून दूर ठेवतील असा विश्वास व्यक्त केलाय.
डावखुरा फास्ट बॉलर मुस्तफीजुर रहमाननं सलग दुसऱ्या सामन्यात भारतीय खेळाडूंची दाणादाण उडवत रविवारी ४३ धावांमध्ये सहा विकेट्स घेतल्या. त्यामुळे पावसामुळे थांबलेल्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात डकवर्थ लुईस पद्धतीनं ६ विकेटनं मॅच जिंकून सीरिजमध्ये २-० अशी आघाडी मिळवली.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.