धोनी खेळला शेवटची वनडे ?

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या शेवटच्या वनडेमध्ये टीम इंडियाचा विजय झाला आहे. पण सीरिज 4-1 ने गमवण्याची नामुष्की टीम इंडियावर आली आहे. या पराभवानंतर महेंद्रसिंह धोनीच्या नेतृत्वावर जोरदार टीका होत आहे. 

Updated: Jan 23, 2016, 05:42 PM IST
 धोनी खेळला शेवटची वनडे ? title=

सिडनी : ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या शेवटच्या वनडेमध्ये टीम इंडियाचा विजय झाला आहे. पण सीरिज 4-1 ने गमवण्याची नामुष्की टीम इंडियावर आली आहे. या पराभवानंतर महेंद्रसिंह धोनीच्या नेतृत्वावर जोरदार टीका होत आहे. त्यातच पुढचे 8 महिने  टीम इंडिया फक्त टी-20 आणि टेस्ट क्रिकेटच खेळणार आहे, त्यामुळे सिडनीमध्ये झालेली वनडे धोनीची शेवटची वनडे असू शकते. 
निवड समितीनं धोनीला टी-20 विश्वचषकापर्यंत वेळ दिला आहे. पण ढासळत चाललेली टीम इंडियाची कामगिरी आणि धोनीचा फॉर्म पाहता निवड समितीचे अध्यक्ष संदीप पाटील धोनीला आणखी एक संधी देतील का ? 2019 चा विश्वचषकात धोनीचं खेळणं जवळपास अशक्य आहे. त्यामुळे नवी टीम उभारण्यासाठी निवड समिती वेगळा विचार करायची शक्यता आहे.

धोनीचा बॅड पॅच
गेले 12 महिने धोनीसाठी आणि टीम इंडियासाठी अतिशय वाईट ठरले.  ऑस्ट्रेलियातल्या वनडे मालिकेत टीम इंडियाचा पराभव झाला. त्याआधी 2015मध्ये दक्षिण आफ्रिकेनं वनडेमध्ये धोनीच्या शिलेदारांना धूळ चारली. बांगलादेशनंही टीम इंडियाचा धुव्वा उडवला, तर 2015च्या वर्ल्ड कपमध्ये टीम इंडियाला सेमी फायनलमध्ये पराभवाला सामोरं जावं लागलं.. तर गेल्या 2 वर्षांमध्ये धोनी 62 वनडे खेळलाय, ज्यात त्याला फक्त एक सेंच्युरी मारता आलीये. 
धोनीचा आणि टीम इंडियाचा हा खराब फॉर्म बघता सिडनी वनडे धोनीची खरचं शेवटची वनडे होती का हे काही दिवसांमध्येच स्पष्ट होईल.