चेन्नई : ६४ घरांचा राजा आणि माजी जगज्जेत्या विश्वनाथन आनंद याची आई सुशीला विश्वनाथन (७९) यांचे आज पहाटे चेन्नईत निधन झाले.
त्यांच्या पश्चात पती के. विश्वनाथ, एक मुलगी आणि दोन मुलगे असा परिवार आहे. आनंदची कारकीर्द घडविण्यात त्यांचा मोलाचा वाटा आहे. सुशीला यांच्या घरातच बुद्धिबळाचे वातावरण होते. त्यांनीच आनंदला या खेळाची गोडी लावली. आईच्या पाठबळामुळे विश्वनाथ जगजेता बनला.
आनंदला सुरवातीच्या स्पर्धांच्या वेळी मानसिक पाठबळ देण्यासाठी त्यांच्यावर खूपच प्रतिकूल परिस्थितीत राहण्याची वेळ आली होती, त्याची आपण कल्पनाही करू शकणार नाही, असे भारतीय बुद्धिबळ महासंघाचे अध्यक्ष पी. आर. वेंकटरमा राजा यांनी सांगितले.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.