वीरेंद्र सेहवागची सचिनच्या टवीटवर फटकेबाजी

 वीरेंद्र सेहवाग सध्या ट्विटरवर जोरदार फटकेबाजी करतोय, यापूर्वी वीरेंद्र सेहवागने मैदानावर आपल्या फटकेबाजीने गाजवलं आहे. 

Updated: Oct 5, 2016, 05:41 PM IST
वीरेंद्र सेहवागची सचिनच्या टवीटवर फटकेबाजी title=

मुंबई :  वीरेंद्र सेहवाग सध्या ट्विटरवर जोरदार फटकेबाजी करतोय, यापूर्वी वीरेंद्र सेहवागने मैदानावर आपल्या फटकेबाजीने गाजवलं आहे. 

वीरेंद्र सहेवागसमोर क्रिकेटचा देव समजला जाणारा मास्टर ब्लास्टर सचिन तेंडूलकर आहे. तरीही विरेंद्र सेहवागने माघार घेताना दिसत नाही. 

टवीटरवर षटकार ठोकत आपणच ट्विटरचे मास्टर ब्लास्टर असल्याचं सिद्ध केलं. आहे, कारण सेहवागने सचिन तेंडूलकरलाही सोडलेलं नाही.
 
भारताने दुसरा कसोटी सामना जिंकल्यानंतर सचिन तेंडूलकरने भारतीय संघाचं कौतुक करणारं ट्विट केलं होतं. 

'विजयाबद्दल आणि पहिल्या क्रमांकावर आल्याबद्दल भारतीय संघाचं अभिनंदन' असं तेंडूलकरने ट्विटमध्ये म्हटलं होतं. सामन्यावेळी कॉमेंट्री करणाऱ्या वीरेंद्र सेहवागने ही संधी साधत म्हटलंय,   'देवा कधीतरी कॉमेंटेटरलाही प्रोत्साहित करत जा' .