ट्विटरवरुन सेहवागची सहा महिन्यात 30 लाखांची कमाई

भारताचा धडाकेबाज फलंदाज वीरेंद्र सेहवागनने क्रिकेटमधून निवृत्ती घेतली असली तरी ट्विटरवरुन तो नेहमीच फलंदाजी करताना आपल्याला दिसतो. 

Updated: Jan 9, 2017, 03:18 PM IST
ट्विटरवरुन सेहवागची सहा महिन्यात 30 लाखांची कमाई title=

मुंबई : भारताचा धडाकेबाज फलंदाज वीरेंद्र सेहवागनने क्रिकेटमधून निवृत्ती घेतली असली तरी ट्विटरवरुन तो नेहमीच फलंदाजी करताना आपल्याला दिसतो. 

ट्विटरवरील त्याचे ट्विटही तितकेच हटके असतात. वाढदिवसाच्या शुभेच्छा देणं असो वा एखाद्यावर टीका करणे असो वीरुचा ट्वीटचा अंदाज काही वेगळाच असतो. 

सध्या सेहवागचे 80 लाखाहून अधिक फॉलोअर्स आहेत. तर गेल्या 6 महिन्यात त्याने यातून तब्बल 30 लाख रुपयांची कमाई केलीये. ही माहिती त्याने एका मुलाखतीदरम्यान दिली होती.