कोलंबो: आतंरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पणासोबत आपला धाक निर्माण करणारा श्रीलंकन स्पिनर अजंता मेंडिसनं एक खुलासा केलाय. जगातील सर्व बॅट्समन या तरुण स्पिनरच्या बॉलचा सामना करण्यापासून वाचू इच्छित होते.
जबरदस्त डेब्यू
मेंडिसच्या बॉल्सचं उत्तर कोणत्याही बॅट्समनकडे नसायचं. मग तो क्रिकेटचा देव असो किंवा स्पिनर्सच्या बॉलवर सिक्सर मारणारा बंगाल टायगर. त्याकाळी मेंडिसनं आपल्या बोटांच्या जादूनं सर्व बॅट्समनला निष्क्रिय केलं होतं. मात्र अचानक परिस्थिती बदलली आणि क्रिकेटमध्ये जितक्या गतीनं मेंडिस आला तितक्याच गतीनं तो गायबही झाला.
आणखी वाचा - धोनीने कसोटीतून अचानक निवृत्ती का घेतली, रवी शास्त्रीने केला खुलासा!
सेहवाग आणि धोनीनं केली धुलाई
आपल्या पदार्पणातील टेस्ट सीरिजमध्ये मेंडिसनं भारताविरुद्ध घरगुती मैदानात तीन टेस्टमध्ये २६ विकेट्स घेतल्या होत्या. क्रिकेटप्रेमींना वाटलं श्रीलंकेला दुसरा मुरलीधरन मिळाला. मात्र नंतर मेंडिसचे वाईट दिवस सुरू झाले. पहिले विरेंद्र सिंह सेहवाग आणि नंतर धोनीनं त्याच्या बॉल्सवर धुलाई सुरू केली. दोघांनी मिळून मेंडिसला हैराण केलं आणि नंतर तेच व्हिडिओ बघून बघून सर्वच खेळाडू मेंडिसची धुलाई करू लागले.
आणखी वाचा - SCORECARD : भारत Vs श्रीलंका (तिसरी टेस्ट)
सर्वात खतरनाक बॅट्समन आहे सेहवाग
आणि आता परिस्थिती अशी आहे की २००८मध्ये आतंरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण करणारा मेंडिस गेल्या सात वर्षात केवळ १९ टेस्ट खेळलाय. यावेळी मेंडिसनं स्वत: एका इंटरव्ह्यूमध्ये सांगितलं, 'मी अनेक आतंरराष्ट्रीय खेळाडूंसाठी बॉलिंग केली, पण त्यातील सर्वात भारताचे धोनी आणि सेहवाग यांनी माझ्या बॉलला चांगलं उत्तर दिलं. विशेष म्हणजे सेहवागला आपण खराब बॉल अजिबात टाकू शकत नाही.'
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.