रवी शास्त्रींनी झापलं, विराटने माफी मागितली

टीम इंडियाचा तडाखेबाज फलंदाज  आणि उपकर्णधार विराट कोहलीने असा काही पराक्रम केला आहे की, रवी शास्त्रीने देखिल त्याच्या अशा वागण्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत. शुकवारी होणाऱ्या लीग सामन्यासाठी आज पहिल्या दिवशी प्रॅक्टीस सेशन झालं, या दरम्यान विराट कोहलीने एका पत्रकाराला अपशब्द ऐकवले. 

Updated: Mar 3, 2015, 06:16 PM IST
रवी शास्त्रींनी झापलं, विराटने माफी मागितली title=

पर्थ : टीम इंडियाचा तडाखेबाज फलंदाज  आणि उपकर्णधार विराट कोहलीने असा काही पराक्रम केला आहे की, रवी शास्त्रीने देखिल त्याच्या अशा वागण्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत. शुकवारी होणाऱ्या लीग सामन्यासाठी आज पहिल्या दिवशी प्रॅक्टीस सेशन झालं, या दरम्यान विराट कोहलीने एका पत्रकाराला अपशब्द ऐकवले. 

कुणीही कल्पना करू शकत नाही, अशी घटना आज घडलीय, कोहली प्रॅक्ट्रीस केल्यानंतर ड्रेसिंग रूमला परतत होता, तेव्हा त्याच्यासमोर एका राष्ट्रीय दैनिकाचा पत्रकार उभा होता.

या पत्रकाराला काही कळण्याआधीच विराट कोहलीने या पत्रकाराला खालच्या शब्दात बोलण्यास देण्यास सुरूवात केली. काही वेळ असंच सुरू होतं, त्यांनतर टीम इंडियाचे काही सदस्यही हे पाहत होते की, नेमकं काय झालंय.

विराटने ज्या पत्रकाराशी हुज्जत घातली त्या पत्रकारालाही कळंत नव्हतं नेमकं विराटला झालंय काय, आणि आपलं चुकलंय काय?

मात्र काही वेळानंतर विराटचा राग कमी झाला, त्यानंतर त्याने कुणाला तरी सांगितलं की, त्याने आपली मैत्रिण अनुष्का शर्माविषयी एका राष्ट्रीय दैनिकात बातमी छापली होती, त्याला वाटलं की तो हाच पत्रकार आहे.

जेव्हा कोहलीने त्या पत्रकाराला ओळखलं नाही, तेव्हा त्याने एका पत्रकाराला बोलावलं आणि त्या घटनेची माफी मागितली.

टीम निर्देशक रवी शास्त्रींनी कोहलीशी यावर स्वत: बातचीत केली. कुणालाही काहीही बोलतांना भान ठेवावं, सार्वजनिक ठिकाणी टीम इंडियाचा खेळाडू म्हणून हे बोलणं आपल्याला शोभत नाही, असा डोस रवी शास्त्रींनी विराट कोहलीला दिला.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.