म्हणून विराट कोहली झाला भावूक

फादर्स डे च्या शुभेच्छा देताना विराट कोहली भावूक झाला. ट्विटरवर विराट कोहलीनं त्याच्या वडिलांबरोबरचा एक फोटो शेअर केला आहे. 

Updated: Jun 19, 2016, 06:33 PM IST
म्हणून विराट कोहली झाला भावूक title=

मुंबई : फादर्स डे च्या शुभेच्छा देताना विराट कोहली भावूक झाला. ट्विटरवर विराट कोहलीनं त्याच्या वडिलांबरोबरचा एक फोटो शेअर केला आहे. आज जर तुम्ही असतात तर मी तुम्हाला कशा शुभेच्छा दिल्या असत्या, जगातली सगळ्यात खंबीर व्यक्ती, असं ट्विट विराट कोहलीनं केलं आहे.

कर्नाटकविरुद्धच्या मॅचमध्ये दिल्लीला फॉलो ऑन मिळाल्यावर कोहली बॅटिंगला आला. दिवसाचा खेळ संपला तेव्हा तो 40 रनवर खेळत होता. यानंतर सकाळी तीन वाजता कोहलीच्या वडिलांचं निधन झालं. असं असतानाही नंतरच्या दिवशी विराट कोहली खेळायला आला आणि त्यानं 90 रन करून मॅच वाचवली. कोहली अठरा वर्षांचा असताना त्याच्या वडिलांचं निधन झालं होतं.