मुंबई : आंतरराष्ट्रीय स्तरावर तिन्ही प्रकारात प्रथम क्रमांकावर राहणाऱ्या विराट कोहलीला विस्डन क्रिकेट अलमॅनकने जगातला सर्वोत्तम क्रिकेटर म्हणून निवडलं आहे.
विरेंद्र सेहवाग आणि सचिन तेंडुलकरनंतर हा मान मिळवणारा तो तिसरा भारतीय खेळाडू ठरला आहे. यावर्षीच्या त्यांच्या मॅक्झिनच्या मुखपृष्ठावर त्याला जागा मिळाली आहे.
गेल्यावर्षी त्याने तिन्ही प्रकारात मिळून २५९५ धावा केल्या ज्यांत सात शतक आणि १३ अर्धशतकांचा समावेश होता.
We are delighted to reveal the cover for 2017, featuring India’s star batsman @imVkohli playing a reverse sweep. https://t.co/dPWtJbrBwb pic.twitter.com/sAnJay6cJ6
— Wisden Almanack (@WisdenAlmanack) 3 February 2017
विस्डनचे संपादक लॉरेन्स बूथ यांनी त्याच्या कौतुकात लिहलंय की, 'विराटसाठी हे वर्ष स्वप्नासारखं होतं. त्याने तिन्ही प्रकारात कोणाच्याही तुलनेत खूप वेगळी खेळी केली. त्याने कसोटी क्रिकेटमध्ये ७५ , एकदिवसीय क्रिकेटमध्ये ९२ तर आंतरराष्ट्रीय मर्यादीत षटकांच्या सामन्यांत १०६ धावांच्या सरासरीने धावा काढल्या.'
विस्डन क्रिकेट अलमॅनकची सुरुवात २००३मध्ये झाली. त्यावर्षीच्या तिन्ही प्रकारात सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या क्रिकेटरचा गौरव हे मॅक्झिन करते.
२००८मध्ये विरेंद्र सेहवाग आणि २०१०ला सचिनला यांनी गौरविलं होतं. विराट यशाच्या सर्वोच्च शिखरावर आहे. तो आपल्या खेळीने एक-एक विक्रम प्रस्थापित करत आहे.