वाईट प्रदर्शनामुळे विराटने घेतली मास्टर ब्लास्टरची मदत

Updated: Sep 19, 2014, 09:07 PM IST
वाईट प्रदर्शनामुळे विराटने घेतली मास्टर ब्लास्टरची मदत title=

नवी दिल्ली : इंग्लंड दौऱ्यात क्रिकेटर विराट कोहली याची कामगिरी खराब होती. या दौऱ्यात त्याने 13.40 सरासरीने रन बनविले होते. विराट कोहली हा मुंबईमध्ये मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरला बॅटिंग टेक्निक सुधारणा करण्याबाबत भेटून गुरूवारी वांद्रे-कुर्ला संकुलातील इंडॉर अकादमीमधील पहिल्या सत्राच्या दरम्यान त्यांनी प्रॅक्टिस केली.

विराटने त्याच्या बॅटिंगमध्ये आलेली कमतरता दूर करण्यासाठी तेंडुलकरला संपर्क साधला होता. कारण नुकत्याच झालेल्या इंग्लंड दौऱ्यात इंग्लंडच्या गोलंदाजाने त्याच्या बॅटिंगचा धुव्वा उडविला होता.  

एका इंग्रजी दैनिकात छापून आलेल्या बातमीनुसार माजी टेस्ट खेळाडू आणि बीसीसीआयचे कोच लालचंद राजपूत आणि युवराज सिंग हे सुद्धा या सत्राच्या वेळी वांद्रे-कुर्ला संकुलात उपस्थित होते. ‘विराटने माझ्यासोबत आणि सचिनसोबत एक सत्र प्रॅक्टिस केली. येत्या काही दिवसांपर्यंत तो इथेच प्रॅक्टिस करणार आहे’ असे राजपूत यांनी माहिती दिली.

सचिनकडून बॅटिंगमधील कमतरता सुधारण्य़ासाठी आलेला विराट हा एकमेव खेळाडू नाही. सचिनने गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये क्रिकेटमधून निवृत्ती घेतली होती. त्यानंतर त्याने अनेक खेळाडूना मदत देखील केली होती. विराटला सचिनच्या मदतीचा लाभ होईल आणि त्याचा हरविलेला फॉर्म परत येईल, अशी आशा करण्यात येते

सचिनने बुधवारी अजिंक्य रहाणेबरोबर नेटवर दोन तास प्रॅक्टिस केली होती. रहाणेने इंग्लंड दौऱ्यात चांगली कामगिरी केली होती. अकादमीकडून असे सांगण्यात येते की, या आधी देखील सचिनने रोहित शर्मा आणि सुरेश रैना यांच्यासोबत नेटवर वेळ घालविला होता. रैनाने कार्डिफमध्ये खेळण्यात आलेल्या दुसऱ्या वनडेमध्ये चांगले प्रदर्शन केल्यात्यानंतर विशेष करून सचिनचे नाव घेऊन धन्यवाद केले होते. सचिनला संपर्क केल्यानंतर त्यांनी यावर काही ही बोलण्यास नकार दिला होता, असे वृत्तात सांगण्यात येते.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.