टी 20 मध्ये कोहलीचा 'विराट' विक्रम

वेस्ट इंडिजविरुद्ध टी 20 वर्ल्ड कपच्या सेमी फायनलमध्ये भारताचा पराभव झाला.

Updated: Apr 1, 2016, 05:45 PM IST
टी 20 मध्ये कोहलीचा 'विराट' विक्रम title=

मुंबई: वेस्ट इंडिजविरुद्ध टी 20 वर्ल्ड कपच्या सेमी फायनलमध्ये भारताचा पराभव झाला. असं असलं तरी या मॅचमध्ये भारताचा हिरो ठरला तो विराट कोहली. विराटनं 47 बॉलमध्ये नाबाद 89 रनची अफलातून खेळी केली. 

या मॅचमध्ये लगावलेल्या हाफ सेंच्युरीमुळे कोहलीनं क्रिस गेल आणि ब्रॅन्डन मॅक्कलमला मागे टाकलं आहे. कोहलीच्या आता आंतरराष्ट्रीय टी 20 क्रिकेटमध्ये 16 हाफ सेंच्युरी झाल्या आहेत. 

आंतरराष्ट्रीय टी 20 क्रिकेटमध्ये क्रिस गेल आणि ब्रॅन्डन मॅक्कलमच्या 15 हाफ सेंच्युरी आहेत, तर श्रीलंकेच्या तिलकरत्ने दिलशानला आत्तापर्यंत 14 हाफ सेंच्युरी करण्यात यश आलं आहे. या क्रमवारीमध्ये ऑस्ट्रेलियाचा डेव्हिड वॉर्नर पाचव्या क्रमांकावर आहे. वॉर्नरच्या खात्यात 12 हाफ सेंच्युरीचा समावेश आहे.