कटकमधील विजयानंतरही नाराज आहे विराट कोहली

इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या वनडे सामन्यात मिळालेल्या विजयानंतर कर्णधार विराट कोहलीने युवराज सिंग आणि महेंद्रसिंग धोनीच्या कामगिरीचे कौतुक केले मात्र त्याचबरोबर सलामीच्या फलंदाजांच्या कामगिरीबाबत नाराजी व्यक्त केली. 

Updated: Jan 20, 2017, 09:13 AM IST
कटकमधील विजयानंतरही नाराज आहे विराट कोहली title=

कटक : इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या वनडे सामन्यात मिळालेल्या विजयानंतर कर्णधार विराट कोहलीने युवराज सिंग आणि महेंद्रसिंग धोनीच्या कामगिरीचे कौतुक केले मात्र त्याचबरोबर सलामीच्या फलंदाजांच्या कामगिरीबाबत नाराजी व्यक्त केली. 

कोहली सामन्यानंतर म्हणाला, आम्ही आमच्या क्षमतेपैकी केवळ ७५ टक्केच कामगिरी करु शकलो. जर पहिल्या फळीतील फलंदाजांनी चांगली कामगिरी केली असती तर अधिक चांगली कामगिरी झाली असती, अशा शब्दात त्याने आपली नाराजी व्यक्त केली केली. 

तो पुढे म्हणाला की, मी या गोष्टीने हैराण झालोय की जर सलामीच्या फलंदाजांनी चांगली सुरवात केली असती तर आमचा किती स्कोर अशता. मात्र ते फलंदाज अपयशी ठरले तर धोनी आणि युवराज या दोघांनी संघाची कमान सांभाळली आणि विजय मिळवून देण्यात मोलाचा वाटा उचलला.