विराटची दिवसाची कमाई दीड कोटी रुपये

भारताचा कसोटी कर्णधार विराट कोहली सध्या जबरदस्त फॉर्ममध्ये आहे. आयपीएलमध्ये विराट कोहलीने दमदार कामगिरी करताना संघाला फायनलपर्यंतचा टप्पा गाठून दिला.

Updated: Jun 2, 2016, 02:02 PM IST
विराटची दिवसाची कमाई दीड कोटी रुपये title=

मुंबई : भारताचा कसोटी कर्णधार विराट कोहली सध्या जबरदस्त फॉर्ममध्ये आहे. आयपीएलमध्ये विराट कोहलीने दमदार कामगिरी करताना संघाला फायनलपर्यंतचा टप्पा गाठून दिला.

भारतीय संघाचा उगवता तारा म्हणून विराट कोहलीकडे पाहिले जातेय. सध्याच्या घडीला तो भारताचा आघाडीचा फलंदाज बनलाय. यासोबतच्या कमाईच्या आकड्यांमध्येही तो आघाडीवर आहे.

अनेक जाहिरात कंपन्यांशी विराट कोहली करारबद्ध असल्याने त्याची कमाईही त्याच्या खेळाप्रमाणेच मजबूत आहे. विराट सध्या एमआरएफ, पेप्सी, ऑडी, विक्स, बुस्ट, यूएसएल, टीव्हीएस, स्मॅश, नितेश इस्टेट्स, टिसॉट, हर्बालाइफ, आदिदास आणि कोलगेट या १३ ब्रँडशी करारबद्ध आहे. 

या करारातून कोहली दर दिवसाला तब्बल दीड कोटी रुपये कमावतो. तर वनडे कर्णधार महेंद्रसिंग धोनीची कमाई एक कोटी इतकी आहे.