मुंबई : पाकिस्तानी बॅट्समन उमर अकमल यांला नॉर्वे येथील एका सामन्यात महिला लेग स्पिनरने क्लिन बोल्ड केले.
दरम्यान, आयपीएलच्या नवव्या सिझनच्या फायनलमध्ये सनरायजर्स हैदराबादनं रॉयल चॅलेंजर्स बैंगलोरचा पराभव केला आणि आयपीएलच्या ट्रॉफीवर आपलं नाव कोरलं. या विजयानंतर वॉर्नरवर शुभेच्छांचा वर्षाव झाला. पाकिस्ताचा खेळाडू उमर अकमल यानंही डेव्हिड वॉर्नरला शुभेच्छा देणारं ट्विट केलं. पण या ट्विटवरून उमर अकमलची ट्विटरवर खिल्ली उडवण्यात आली. हे ट्विट करताना उमर अकमलनं चूक केली होती.
नॉर्वे येथे महिलांचा क्रिकेट सामना भरविण्यात आला होता. या सामन्यासाठी उमर अकमल प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होता. यावेळी खेळताना महिला लेग स्पिनरने त्याला बोल्ड केले.