विराटने अनुष्कासोबत साजरा केला व्हॅलेंटाइन्स डे

भारताचा कर्णधार विराट कोहली आणि अनुष्का शर्मा आपल्या नात्याबद्दल कधीही खुलेपणाने बोलत नाहीत. मात्र व्हॅलेंटाइन्स डेच्या दिवशी मात्र विराट कोहलीने आपले प्रेम सोशल मीडियाद्वारे जाहीर केले. 

Updated: Feb 16, 2017, 08:13 AM IST
विराटने अनुष्कासोबत साजरा केला व्हॅलेंटाइन्स डे title=

मुंबई : भारताचा कर्णधार विराट कोहली आणि अनुष्का शर्मा आपल्या नात्याबद्दल कधीही खुलेपणाने बोलत नाहीत. मात्र व्हॅलेंटाइन्स डेच्या दिवशी मात्र विराट कोहलीने आपले प्रेम सोशल मीडियाद्वारे जाहीर केले. 

व्हॅलेंटाइन्स डे निमित्त विराटने अनुष्कासाठी प्रेमाचा संदेश लिहिलेली एक पोस्ट इन्स्टाग्रामवर पोस्ट केलीये. 

कोहलीने दोघांचा फोटो इन्स्टाग्रामवर पोस्ट केलाय. त्यासोबतच 'तुझी इच्छा असेल तर प्रत्येक दिवस व्हॅलेंटाइन्स डे असेल. अनुष्का तुझ्यामुळे माझा प्रत्येक दिवस व्हॅलेंटाईन्स डे असतो.' असं त्याने म्हटलंय.

कोहली आणि अनुष्का गेल्या अनेक दिवसांपासून एकत्र आहेत. अनेकदा त्यांना एकत्र पाहिले गेलेय. काही दिवसांपूर्वी नवीन वर्षाच्या सुरुवातीला देहरादूनमध्ये हे दोघेही लग्न करणाऱ असल्याच्या चर्चांना ऊत आला होता. मात्र विराटने ट्विट करुन हे वृत्त फेटाळून लावले. 

 

Everyday is a valentine day if you want it to be. You make everyday seem like one for me. @anushkasharma

A post shared by Virat Kohli (@virat.kohli) on