आयसीसी रँकिंगमध्ये विराट-विलियम्सन तिन्ही फॉरमॅटमध्ये टॉप-५ मध्ये

भारतीय क्रिकेट टीमचा कर्णधार विराट कोहली आणि न्यूजीलंडचा कर्णधार केन विलियमसन आयसीसी रँकींगमध्ये तिन्ही फारमॅटमध्ये टॉप ५ मध्ये आहेत. विलियमसन वनडे रँकिंगमध्ये पाचव्या स्थानावर आहे.

Updated: Jan 10, 2017, 05:21 PM IST
आयसीसी रँकिंगमध्ये विराट-विलियम्सन तिन्ही फॉरमॅटमध्ये टॉप-५ मध्ये title=

दुबई : भारतीय क्रिकेट टीमचा कर्णधार विराट कोहली आणि न्यूजीलंडचा कर्णधार केन विलियमसन आयसीसी रँकींगमध्ये तिन्ही फारमॅटमध्ये टॉप ५ मध्ये आहेत. विलियमसन वनडे रँकिंगमध्ये पाचव्या स्थानावर आहे.

सोमवारी जाहीर केलेल्या यादीमध्ये टी २० रैंकिंगमध्ये टॉप ५ मध्ये पोहोचला आहे. टी-२० फलंदाजांच्या यादीत कोहली पहिल्या तर टेस्ट आणि वनडेमध्ये दुसऱ्या स्थानावर आहे. कोहली आणि विलियमसन दोन असे क्रिकेटर आहेत जे तिन्ही फॉरमॅटमध्ये पहिल्या ५ मध्ये आहेत.

विलियमसन टेस्ट आणि टी20 मध्ये चौथ्या स्थानावर आहे. महत्त्वाचं म्हणजे कोहली आणि विलियमसन यांनी २००८ मध्ये आयसीसी अंडर-१९ वर्ल्डकप कपममध्ये आपल्या आपल्या संघाचे कर्णधार होते. भारताने फायनलमध्ये दक्षिण आफ्रिकेला १२ रन्सने हरवत वर्ल्डकप जिंकला होताय