रैनाच्या लग्नाला येणार व-हाडी कोण-कोण?

भारतीय क्रिकेट टीममधील स्टार प्लेयर सुरेश रैना उद्या लग्नाच्या बेडीत अडकणार आहे. मेरठच्या प्रियांका चौधरीसोबत सुरेश रैनाचा विवाह होणार आहे. दिल्लीच्या लीला पॅलेस हॉटेलमध्ये हा लग्न सोहळा पार पडणार आहे.

Updated: Apr 2, 2015, 04:19 PM IST
रैनाच्या लग्नाला येणार व-हाडी कोण-कोण? title=

नवी दिल्ली : भारतीय क्रिकेट टीममधील स्टार प्लेयर सुरेश रैना उद्या लग्नाच्या बेडीत अडकणार आहे. मेरठच्या प्रियांका चौधरीसोबत सुरेश रैनाचा विवाह होणार आहे. दिल्लीच्या लीला पॅलेस हॉटेलमध्ये हा लग्न सोहळा पार पडणार आहे.

या VIP लग्नसोहळ्यात राजकारणातील आणि क्रिकेट क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित राहणार असल्याची माहिती एका मीडिया रिपोर्टद्वारे स्पष्ट झाली आहे.

रैनाच्या लग्नात पंतप्रधान नरेंद्र मोदी, यूपीचे मुख्यंमत्री अखिलेश यादव तसेच भारताची क्रिकेटची संपूर्ण टीम उपस्थित राहणार आहे. याशिवाय सचिन तेंडुलकर, सुनिल गावस्कर, रवी शास्त्री, व्हीव्हीएस लक्ष्मण, सौरव गांगुली, राहुल द्रविड, एन श्रीनिवासन यांच्यासह जवळपास २७० जणांना आमंत्रण देण्यात आले आहे. लग्नात जास्त पाहुणे लखनऊचे असणार आहेत, जेथे रैना जास्त काळ वास्तव्याला होता.

त्यामुळे रैनाचा लग्न सोहळा भव्य आणि अलिशान होणार याबद्दल काही दुमत नाही.

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.