विनेष फोगटची कुस्तीमध्ये दुर्घटना, ऑलिम्पिकमधून बाहेर

 भारताची विरंगणा विनेष फोगट हिचा महिला कुस्ती स्पर्धेत झालेल्या अपघातात गुडघ्याला जबरदस्त दुखापत झाल्यामुळे ऑलिम्पिकमधील प्रवास संपला. 

Updated: Aug 17, 2016, 09:02 PM IST
विनेष फोगटची कुस्तीमध्ये दुर्घटना, ऑलिम्पिकमधून बाहेर  title=

रिओ :  भारताची विरंगणा विनेष फोगट हिचा महिला कुस्ती स्पर्धेत झालेल्या अपघातात गुडघ्याला जबरदस्त दुखापत झाल्यामुळे ऑलिम्पिकमधील प्रवास संपला. 

४८ किलो वजनी गटात विनेष फोगट हिचा सामना चीनच्या कुस्तीपटू सून यान शी सुरू होता. पहिल्या राऊंडमध्ये विनेष फोगट सुरूवातीला आघाडीवर होती पण  ५० सेकंद शिल्लक असताना अपघातात झाला. सून याने हिने फोगटचा पाय पकडला आणि तिच्या पायावर संपूर्ण शरिराचा भार टाकला. त्यात गुडघ्याचा दुखापतग्रस्त झाला. 

गुडघा दुखापत ग्रस्त झाल्यावर विनेष फोगट कळवळली आणि कुस्तीच्या मॅटवर गडाबड लोळू लागली. त्यानंतर सर्वांना लक्षात आले की विनेषला दुखापत झाली. 

सुमारे ४ ते ५ मिनिटे दुखापतीने विनेष तळमळत होती. त्यानंतर आपण देशासाठी खेळायला आलो होत. आता खेळता येणार नाही या विचाराने तिला रडू कोसळले. 

सून यानही सून्न 

चीनच्या कुस्तीपटू सून यान हिला या मुकाबल्यात विजयी ठरविण्यात आले. पण सून यान या चीन कुस्तीपट्टून झालेल्या अपघातानंतर खूप वाईट वाटले. तीने विजय साजरा केला नाही. तिच्या चेहऱ्यावर विनेषच्या दुखापतीची चिंता अधिक दिसत होती.