'मला बॅटिंग देत नाहीत'

बॅटिंग मिळण्यासाठी हापापलेले क्रिकेटर आपण गल्लीबोळामध्ये नेहमीच पाहतो, पण याचाच प्रत्यय आता आंतरराष्ट्रीय पातळीवर आला आहे. 

Updated: Mar 21, 2016, 09:53 AM IST
'मला बॅटिंग देत नाहीत' title=

कोलकता: बॅटिंग मिळण्यासाठी हापापलेले क्रिकेटर आपण गल्लीबोळामध्ये नेहमीच पाहतो, पण याचाच प्रत्यय आता आंतरराष्ट्रीय पातळीवर आला आहे. 

मला बॅटिंग मिळत नाही त्यासाठी तुम्ही पाकिस्तानच्या टीम मॅनेजमेंटशी बोला, इम्रान खानबरोबरचा उमर अकमलचा हा व्हिडिओ सध्या व्हायरल झाला आहे. या व्हिडिओमुळे मात्र उमर अकमल चांगलाच गोत्यात आला आहे. 

उमर अकमलला पुढच्या मॅचमध्ये टीमबाहेर बसवा, अशी मागणी पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू रमीझ राजा यानं केली आहे. तर पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष शहरयार खानही उमर अकमलच्या या वागणुकीमुळे नाराज झाले आहेत. 

भारताविरुद्धच्या मॅचआधी आत्मविश्वास वाढवण्यासाठी इम्रान खाननं पाकिस्तानी टीमची भेट घेतली, यावेळी उमर अकमलनं इम्रान खानला एकांतात गाठलं. मला वरच्या नंबरवर बॅटिंग करायची आहे, तुम्ही शाहिद आफ्रिदीला सांगा असं उमर अकमल म्हणाला. या दोघांमधला हा संवाद कॅमेरात शूट झाल्यानं आता अकमलच्या अडचणी वाढल्या आहेत. 

पाहा उमर अकमलचं रडगाणं