काय आहे या फोटोमागचं सत्य ?

2016 च्या टी 20 वर्ल्ड कपमध्ये भारताचे स्टार खेळाडू ठरले ते विराट कोहली आणि आशिष नेहरा.

Updated: Apr 4, 2016, 07:54 PM IST
काय आहे या फोटोमागचं सत्य ? title=

मुंबई: 2016 च्या टी 20 वर्ल्ड कपमध्ये भारताचे स्टार खेळाडू ठरले ते विराट कोहली आणि आशिष नेहरा. या दोघांचाही एक फोटो सध्या सोशल नेटवर्किंगवर व्हायरल होत आहे.

या फोटोमध्ये आशिष नेहरा विराट कोहलीला सन्मानित करत आहे. 13 वर्षांपूर्वीचा म्हणजेच 2003 सालचा हा फोटो आहे. अंडर 16 मध्ये झालेल्या एका मॅचवेळी आशिष नेहरानं कोहलीला सन्मानित केलं होतं. दिल्लीच्या हरीनगर स्पोर्ट्स कॉम्प्लेक्समध्ये ही मॅच झाली होती. 

विराट कोहलीकडे सध्या भारताच्या टेस्ट क्रिकेटचं नेतृत्व आहे, पण आशिष नेहरा मात्र टेस्ट क्रिकेट खेळत नाही. नुकत्याच झालेल्या एका मॅचमध्ये विराट कोहलीनं दिल्लीचं नेतृत्व केलं होतं. या मॅचमध्ये कोहलीच्या नेतृत्वाखाली 36 वर्षांचा आशिष नेहराही खेळला होता.