पहिल्या सत्रात भारताचे तीन फलंदाज तंबूत

भारत वि ऑस्ट्रेलिया यांच्यातील पहिल्या कसोटी सामन्यात फलंदाजांपेक्षा गोलंदाजांचाच खेळ अधिक पाहायला मिळतोय. ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव २६० धावांत गुंडाळल्यानंतर भारताचीही पहिल्या डावात मोठी पडझड पाहायला मिळाली. 

Updated: Feb 24, 2017, 12:06 PM IST
पहिल्या सत्रात भारताचे तीन फलंदाज तंबूत  title=

पुणे : भारत वि ऑस्ट्रेलिया यांच्यातील पहिल्या कसोटी सामन्यात फलंदाजांपेक्षा गोलंदाजांचाच खेळ अधिक पाहायला मिळतोय. ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव २६० धावांत गुंडाळल्यानंतर भारताचीही पहिल्या डावात मोठी पडझड पाहायला मिळाली. 

दुसऱ्या दिवसाच्या पहिल्या सत्रात अवघ्या ४४ धावांत भारताचे तीन फलंदाज बाद झालेत. सलामीवीर मुरली विजय १० धावांवर बाद झाला. चेतेश्वर पुजारा ६ धावांवर तंबूत परतला. तर कर्णधार विराट कोहलीला या डावात भोपळाही फोडता आला नाही. 

पहिल्या दिवसाच्या खेळावर पूर्णपणे भारतीय गोलंदाजांचे वर्चस्व राहिले. पहिल्या दिवशी भारताने २५६ धावांत ऑस्ट्रेलियाचे ९ गडी बाद केले. यात उमेश यादवने सर्वाधिक ४ बळी घेतले.