मुंबई : जगात टी-२० चा पहिला सामना २००७ साली खेळला गेला आणि त्याच वर्षी महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली भारताने पहिलाच वर्ल्ड कप जिंकला... आजपर्यंत पाच वेळा टी २० वर्ल्ड कप खेळला गेला असून दरवेळी तो वेगळ्या संघाने जिंकला आहे.
पण, तरी यंदाच्या वर्ल्डकपचा विचार केला तर भारताचा कर्णधार महेंद्रसिंग धोनी हे नाणं इतर संघाच्या कर्णधारांपेक्षा जास्तच जड असल्याचं जाणवतंय. अनेक बाबतीत तो इतर कर्णधारांपेक्षा जास्त पटीनं सरस आहे.
- टी २० च्या सामन्यांत सर्वात जास्त वेळा कर्णधारपद भूषवण्याचा विक्रम धोनीच्या नावावर आहे.
- आजवर धोनीने भारतासाठी ६२ आंतरराष्ट्रीय टी-२० सामन्यांत कर्णधारपद भूषवले आहे. यात वर्ल्ड टी-२० मधील २८ सामन्यांचाही समावेश आहे.
- धोनीच्या नेतृत्वाखाली भारताला वर्ल्ड टी-२० मध्ये आजवर १३ सामन्यांत विजय मिळाला आहे... तर नऊ सामने भारताने गमावले आहेत. आयर्लंडचा कर्णधार पोर्टफील्डने धोनीसोबत या बाबतीत विक्रम केला आहे. यासोबतच, धोनी आणि पोर्टफील्ड टी-२० मध्ये सर्वात जास्त मॅच गमावणारे कर्णधार ठरलेत.
- धोनीच्या कप्तानीखाली भारताने आजवर वर्ल्ड टी-२० मध्ये १६ वेळा टॉस जिंकला आहे. हा एक रेकॉर्डच म्हणावा लागेल.
- भारतीय संघासाठी सर्वांत जास्त म्हणजे २८ वर्ल्ड टी-२० सामने खेळणारा खेळाडू म्हणून धोनीची ओळख आहे. विशेष म्हणजे, यातील सर्व सामने त्याच्याच कप्तानीखाली खेळले गेले आहेत.