भारताचा पराभव होण्याची ही ५ कारणे

भारताने ऑस्ट्रेलियाला त्यांच्याच भूमीत हरवण्याची किमया साधली खरी मात्र त्यांचा करिश्मा भारतात चालला नाही. 

Updated: Feb 10, 2016, 12:06 PM IST
भारताचा पराभव होण्याची ही ५ कारणे title=

पुणे : भारताने ऑस्ट्रेलियाला त्यांच्याच भूमीत हरवण्याची किमया साधली खरी मात्र त्यांचा करिश्मा भारतात चालला नाही. पहिल्याच सामन्यात श्रीलंकेने भारताची विजयाची नशा उतरवली. ऑस्ट्रेलिया मालिकेत भारतीय फलंदाजाची मोठी स्तुती झाली मात्र श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यात काही चुकांमुळे भारताच्या पदरी पराभव पडला. 

ही आहेत भारताच्या पराभवाची पाच कारणे

१. कमकुवत फलंदाजी भारताच्या पराभवाचे प्रमुख कारण ठरले. 

२. इतकं कमी लक्ष्य असल्याने गोलंदाजांना वावच मिळाला नाही. 

३. पिच चांगली असताना भारतीय गोलंदाजांचा दम निघतो

४. गोलंदाजांना खेळपट्टीची मदत मिळत होती. खेळपट्टीवर चेंडू उसळत होता मात्र भारतीय गोलंदाजांना त्याचा फायदा घेता आला नाही. 

५. श्रीलंकेच्या खेळाडूंनी सामन्यासाठी विशेष रणनिती बनवली होती. ते पूर्ण तयारिनीशी आले होते. त्यांच्या कमालीचा आत्मविश्वास दिसत होता.